हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कर्जत नगरपंचायत निवडणूकित राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपच्या गडाला सुरुंग लावत हादरा दिला आहे. कर्जत नगरपंचायतसाठी 17 जागांपैकी 12 जागा जिंकत राष्ट्रवादी काँग्रेसने कर्जत नगरपंचायत राष्ट्रवादी काँग्रेसने ताब्यात घेतली.
गेल्या काही वर्षांपासून कर्जत नगरपंचायत भाजपच्या ताब्यात होती. मात्र आमदार रोहित पवार यांचा करिष्मा कर्जत मध्ये पाहायला मिळाला. भाजप नेते आणि माजी मंत्री राम शिंदे यांच्यासाठी हा खूप मोठा धक्का मानला जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार व भाजपाचे माजी मंत्री प्रा. राम शिंदे या दोन नेत्यांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली. प्रचारात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींनी कर्जतमधील वातावरण ढवळून निघाले होते. कर्जत नगरपंचायत निवडणुकीत 80 टक्के मतदान झालं होतं. अनेक वर्षांपासून ही नगरपंचायत भाजपच्या ताब्यात होती. सत्ता राखण्यासाठी शिंदेंनी सर्व शक्ती पणाला लावली मात्र रोहित पवार यांच्यापुढे भाजपचा सुफडा साफ झाला