हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील कोरोनाला रोखण्यासाठी गर्दी होईल असे राजकीय कार्यक्रम टाळा असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसने मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला आहे. गर्दी होईल असा एकही राजकीय कार्यक्रम घेण्यास राष्ट्रवादी काँग्रेसकडून घेण्यात येणार नाही असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.
राज्यातील सर्व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रम घेऊन गर्दी जमवू नये किंवा एखाद्या कार्यक्रमात गर्दी होईल असा कार्यक्रम घेऊ नये. असा आग्रह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळ बैठकीत धरला आणि तशा सूचना महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना केल्या आहेत. त्यामुळे करोना संसर्गाचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता गर्दी टाळण्यासाठी पावले टाकली पाहिजेत, ही पक्षाची भूमिका असल्याचे नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले-
“राज्याचा मुख्यमंत्री म्हणून सरकारला या संकटाशी सामना करण्यासाठी संपूर्ण तयारीत राहण्याच्या स्पष्ट सूचना आहेतच, पण सत्ताधारी, विरोधी अशा सर्वच पक्षांना मी आवाहन करीत आहे की, आता अधिक काळजी घ्या. गर्दीचे कार्यक्रम टाळा. सण, उत्सव आले आहेत, त्यावर निर्बंध लावावेत असे कोणाला वाटेल? पण शेवटी आपलं आरोग्य, प्राण महत्त्वाचे. उत्सव नंतरही साजरे करू असे उद्धव ठाकरे यांनी म्हंटल