कंगनाने खाल्ल्या मिठाला तरी जागायचे होते; रुपालीताई चाकणकरांचा हल्लाबोल

0
36
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । “भारताला 15 ऑगस्ट 1947 साली स्वातंत्र्य मिळाले नव्हते, ती भीक होती. देशाला खरे स्वातंत्र्य 2014 मध्ये मिळाले’’, असे विधान अभिनेत्री कंगना राणावत यांनी एका कार्यक्रमात केली आहे. यावरून राष्ट्रवादी महिला काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशच्या प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी कंगनावर हल्लाबोल केला आहे. “ज्या झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांच्या नावे सिनेमा बनवला, पैसे कमावले त्या खाल्ल्या मिठाला तरी कंगना राणावत हिने जागायचे होते,” अशी टीका चाकणकर यांनी केली.

राष्ट्रवादी महिला काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशच्या प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी ट्विट करीत कंगना राणावत हिच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे की, देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या आणि आपल्या प्राणांची आहुती दिलेल्या प्रत्येकाचा हा अपमान आहे. ज्या झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांच्या नावे सिनेमा बनवला, पैसे कमावले त्या खाल्ल्या मिठाला तरी जागायचे होते.

देशाची एकता, अखंडता आणि अस्मिता यामध्ये फूट पाडणाऱ्या कंगना राणावतचा पद्मश्री पुरस्कार केंद्र सरकारने काढून घ्यावा आणि तिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून आपण अशा देशद्रोह्यांना पाठीशी घालत नाही हे केंद्र सरकारने सिद्ध करावे, अशी मागणीही यावेळी चाकणकर यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here