मुंबई । धनगर आरक्षणाला राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर पाठींबा दिला आहे. आदिवासींच्या जागांना धक्का न लावता धनगरांना आरक्षण दिलं जाऊ शकतं अशी राष्ट्रवादीची भूमिका आहे. देशातील शंभर ते सव्वाशे शेतकरी संघटना आंदोलन करणार आहेत. त्यांना पाठिंबा द्यायची आमच्या पक्षाची भूमिका असल्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ओबीसींनी मन मोठं करून मराठा समाजाला आरक्षणात सामावून घ्यावं असं अमोल कोल्हे म्हणाले होते. या पार्श्वभुमीवर राष्ट्रवादीने धनगर आरक्षणाला जाहीर पाठींबा देऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
राज्यसभेत कृषी विधेयकांवरील चर्चेवेळी आपण का हजर नव्हतो, याचे स्पष्टीकरणही शरद पवार यांनी पत्रकारपरिषदेत दिले. मराठा आरक्षणाला दिलेल्या स्थगितीबद्दल मी गेले दोन दिवस राज्य सरकारशी चर्चा करत आहे. मी अनेक कायदे तज्ज्ञांबरोबरही बोललो. मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासाठी लवकरात लवकर अपील करणे गरजेचे आहे. त्यासाठी मला मुंबईत थांबावे लागले आणि दिल्लीला जाता आले नाही, असे शरद पवार यांनी सांगितले.
पवारांचा अन्नत्याग
कृषी विधेयकांवरील चर्चेदरम्यान गोंधळ घातल्याने निलंबित करण्यात आलेल्या सदस्यांनी अन्नत्याग केला आहे. त्यांना समर्थन म्हणून आपणदेखील त्यांच्यात सहभागी होत आज दिवसभर अन्नत्याग करणार असल्याचं शरद पवार यांनी सांगितलं आहे. राज्यसभेच्या उपसभापतींची भूमिका सदनाच्या प्रतिष्ठेची त्या पदाचा प्रचंड अवमूल्यन करणारी आहे. त्यामुळे सदस्यांनी जे अन्नत्याग उपोषण केलं आहे त्याला पाठिंबा देत आज एकदिवसाचे अन्नत्याग करत उपसभापतींच्या तथाकथित गांधीगिरीबाबत शरद पवारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.