व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

कौतुकास्पद ! नीरज चोप्राने स्वतःचाच विक्रम मोडला आणि केला नवा राष्ट्रीय विक्रम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचणाऱ्या नीरज चोप्राने (Neeraj Chopra) आता नवा राष्ट्रीय विक्रम केला आहे. मात्र त्याला या स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकता आलेले नाही. हरियाणाच्या या खेळाडूला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. फिनलंडमध्ये सुरू असलेल्या पावो नुर्मी गेम्समध्ये त्याने 89.03 मीटर लांब भाला फेक केली. त्याआधी त्यानं 87.58 मीटर लांब भाला फेक केली होती. ज्यामुळे त्याला गेल्या वर्षीच्या ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळाले होते. ऑलिम्पिकनंतर 10 महिन्यांनी नीरज चोप्राची (Neeraj Chopra) ही पहिलीच स्पर्धा होती.

ऑलिव्हियर हेलँडरला सुवर्णपदक
पावो नूरमी ही जागतिक ऍथलेटिक्स कॉन्टिनेंटल टूरमधील सुवर्ण स्पर्धा आहे. ही डायमंड लीग नंतरची सर्वात मोठी ट्रॅक आणि फील्ड स्पर्धा मानली जाते. या स्पर्धेत 89.93 मीटर अंतरावर भालाफेक करणाऱ्या फिनलंडच्या ऑलिव्हियर हेलँडरला सुवर्णपदक मिळाले. या स्पर्धेत नीरज (Neeraj Chopra) हा एकमेव खेळाडू होता. त्याच्या या कामगिरीमुळे पुढील वर्षी होणाऱ्या जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप आणि राष्ट्रकुल स्पर्धेतही त्याच्याकडून कामगिरी अपेक्षित आहे.

नीरजला दुसरे स्थान मिळाले
नीरजची (Neeraj Chopra) 10 महिन्यांनंतरची ही पहिलीच स्पर्धा होती आणि त्याने दुसऱ्या प्रयत्नात 89.30 मीटर लांब भाला फेक केली. ही भालाफेक आता त्याचा सर्वोत्तम थ्रो बनला आहे. त्याने या स्पर्धेत पहिल्याच प्रयत्नात 86.92 मीटर भालाफेक केली. नीरजचा तिसरा, चौथा आणि पाचवा प्रयत्न फेल ठरला. नीरजनं (Neeraj Chopra) शेवटच्या प्रयत्नात 85.85 मीटर भालाफेक पूर्ण केली आणि या स्पर्धेत रौप्य पदकाची कमाई केली.

हे पण वाचा :
सासरच्या जाचाला कंटाळून सांगलीत विवाहितेची आत्महत्या

डिजिटल पेमेंट करण्यासाठी Google Pay शी क्रेडिट कार्ड कसे लिंक करायचे ते जाणून घ्या

ऑस्ट्रेलियाच्या ‘या’ खेळाडूचे वन डे क्रिकेटमध्ये तिहेरी शतक, असा पराक्रम करणारा ठरला पहिलाच फलंदाज

BCCI ने घेतलेल्या ‘त्या’ निर्णयामुळे मोहम्मद कैफ झाला इमोशनल

गेल्या 21 दिवसात ‘या’ दोन शेअर्सने दिला 100% नफा !!!