‘या’ कारणामुळे पुतण्याणे भर चौकात काकाची सुरा भोकसून हत्या केली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद प्रतिनिधी | पुतण्याने सख्ख्या काकाची भर चौकात सुरा भोकसून हत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. घराच्या आर्थिक व्यवहारावरून देवळाई चौकात भर रस्त्यावर पुतण्याने काकाची भोसकून हत्या के्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी पुंडलिक नगर परिसरात घडली. पोलीसांना आरोपीला जेरबंद करण्यात यश आले असून पुढील तपास सुरु आहे.

शेख सत्तार सांडू असे मृत चुलत्याचे नाव आहे तर शेख कलीम शेख बीड बायपास असे खून करणाऱ्या पुतण्याचे नाव आहे. याबाबत पुंडलिक नगर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की मृत शेख सत्तार आणि शेख कलीम यांच्यामध्ये घराच्या आर्थिक व्यवहारामुळे काल वादविवाद झाला होता या वादविवादानंतर सत्ता आहे मेहुण्यासोबत देवळाई चौकातील एका हॉटेलवर चहा पिऊन गप्पा मारल्यानंतर घराकडे जात असताना आरोपीने त्यांना रस्त्यावर अडविले व सपासप वार करीत धारदार चाकूने त्यांना भोकसले. या घटनेनंतर आरोपी अलीम पसार झाला. नागरिकांनी पोलिसांच्या मदतीने उभ्या असलेल्या गाडीचा सत्तार यांना रुग्णालयात हलविले. मात्र तेथे डॉक्टरांनी तपासून त्यांना मयत घोषित केले.

या प्रकरणी पुंडलीकनगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी हा पैठण येथे लपून बसला असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पुंडलीकनगर पोलिसांच्या एका पथकाने पैठण येथे सापळा रचत आलीम ला आज सकाळी सात वाजेच्या सुमारास अटक केली.त्याने हत्येची कबुली दिली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे करीत आहेत.