नेरळ – माथेरान शटल सेवा ठरली मध्य रेल्वेसाठी फायदेशीर; तब्बल 2.36 कोटींचा महसूल मिळाला

Neral - Matheran Shuttle Service
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | नेरळ – माथेरान म्हंटल की आपल्याला आठवते ते निसर्ग सौंदर्य.. . नेरळ – माथेरान  हे मुंबई व पुणेकरांसाठी पर्यटनाचे ठरलेलं ठिकाण. त्यामुळे येथे येणाऱ्यांची संख्याही तेवढीच मोठी आहे. नेरळ – माथेरानला फिरायला जाण्यासाठी पावसाळा आणि हिवाळा हे दोन ऋतू महत्वाचे मानले जातात. त्यातच सध्या हिवाळा सुरु असल्यामुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात आणि एन्जॉय साजरा करत असतात. प्रवाशांना आरामदायी प्रवास मिळावा यासाठी नेरळ/अमन लॉज आणि माथेरान दरम्यान प्रवाशांसाठी शटल सेवा सुरु करून या ठिकाणाना लोकप्रिय बनवण्यासाठी मध्य रेल्वेने महत्वाची भूमिका बजावली होती. आत्तापर्यंत एप्रिल ते नोव्हेंबर 2023 मध्ये या शटल सेवेतून तब्बल एकूण 2.36 कोटी महसूल मिळाला आहे.

2023 मध्ये 2.36 कोटींचा मिळवला महसूल

पर्यटकांना अधिक चांगली सेवा देण्यासाठी अनेक प्रकल्प हाती घेतले जातात. त्यामुळे ही शटल सेवा स्वस्त आणि जलद करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तसेच या वाहतुकीची गती वाढण्यासही मदत होणार आहे. एप्रिल ते नोव्हेंबर 2023 पर्यंत याठिकाणी 3 लाख प्रवाश्यांनी प्रवास केला आहे त्यामुळे या कालावधीत एकूण 2.36 कोटी महसूल मिळाला आहे. यां आकड्यामुळे यां स्थळाची लोकप्रियता वाढत आहे असे दिसून येते. मध्य रेल्वेच्या प्रमुख पर्यटन स्थळापैकी एक स्थळ म्हणून हे ठिकाण लोकप्रिय आहे.

कोणत्या महिन्यात किती प्रवाश्यांनी केला प्रवास?

एप्रिल महिन्यात एकूण 40,023 लोकांनी प्रवास केला असून यामध्ये 30,16,550 एवढी कमाई झाली आहे. मे महिन्यात हीच प्रवासी संख्या 56,931 वर जाऊन पोहोचली. त्यामुळे एकूण कमाई 46,48,861 एवढी झाली. जून महिन्यात 40,362 एवढी प्रवासी संख्या होती. तर एकूण कमाई 28,72,574 एवढी झाली. जुलै महिन्यात 39,179 एवढे प्रवासी होते. तर कमाई ही 27,58,021 एवढी झाली. ऑगस्टमध्ये ही संख्या 40,396 वर येऊन पोहोचली. तर एकूण कमाई ही 26,55,935 झाली. सप्टेंबर मध्ये 35,817 प्रवासी संख्या असून 23,23,865 एवढी कमाई झाली. तर ऑक्टोबर महिन्यात 34,887 प्रवश्यांनी प्रवास केला असून 19,57,592 एवढा नफा मिळवला. तर नोव्हेंबर मध्ये 46,447 एवढी झाली तर 33,76,644 एवढी कमाई झाली. त्यामुळे ही एकूण प्रवासी संख्या ही 3,34,042 वर जाऊन पोहोचली आहे. त्यामुळे 2,36,10,042  एवढी कमाई झाली आहे.