Netflix ची नवीन ग्राहकांसाठी ‘हि’ खास ऑफर; बेसिक आणि स्टॅण्डर्ड प्लॅन होणार मोफत अपग्रेड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ऑनलाइन स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मची भारतातली वाढती लोकप्रियता आणि जास्तीत जास्त लोकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी अनेक कंपन्यात चढाओढ सुरु आहे. यामुळे या क्षेत्रातील बड्या कंपन्याही आता विविध स्कीम्सच्या माध्यमातून नवीन ग्राहकांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करीत आहेत. स्ट्रीमिंगच्या बाबतीत, जगातील नंबर एकची कंपनी असलेल्या नेटफ्लिक्सने आता भारतात नवीन ग्राहकांसाठी काही खास ऑफर दिलेल्या आहेत.

नेटफ्लिक्सने आपल्या ग्राहकांसाठी ‘प्लॅन अपग्रेड’ स्कीम सुरू केली आहे. या अंतर्गत, कोणताही ग्राहक बेसिक किंवा स्टॅण्डर्ड प्लॅन घेईल, त्यांना कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय या प्लॅनचा लाभ दिला जाईल.

बेसिक आणि स्टॅण्डर्ड प्लॅनसाठी स्कीम
नेटफ्लिक्सची बेसिक, स्टॅण्डर्ड आणि प्रीमियम हे तीन प्लॅन आहेत. या तीनही प्लॅनमध्ये वेगवेगळ्या सुविधा आहेत. अशा परिस्थितीत जर एखादा ग्राहक ४९९ रुपयांची बेसिक मेंबरशिप घेत असेल तर नेटफ्लिक्स त्याला स्टॅण्डर्ड मेंबरशिप (दरमहा ६९९ रुपये) मध्ये रुपांतरित केले जाईल.

त्याचप्रमाणे, ६९९ रुपयांच्या स्टॅण्डर्ड मेंबरशिपसह सुरु होणार्‍या ग्राहकांना ७९९ रुपयांच्या प्रीमियम प्लॅनवर ऑटो-अपग्रेड केले जाईल. प्रीमियम मेंबरशिपमध्ये,यूजरला एकाचवेळी ४ स्क्रीनसह अल्ट्रा एचडी कॉन्टेंटची सुविधा मिळते.

मात्र, ही सुविधा केवळ नवीन मेंबरशिप घेणार्‍या ग्राहकांना दिली जाईल, असे कंपनीने स्पष्ट केले आहे. याव्यतिरिक्त, मेंबर्सना ३० दिवसांच्या अपग्रेड केलेल्या प्लॅनचाही लाभ घेता येईल.

३० दिवसांनंतर जुन्या प्लॅनकडे परत
मात्र, ३० दिवसांची मुदत पूर्ण झाल्यावर नेटफ्लिक्स आपल्या मेंबर्सना अपग्रेड केलेला प्लॅन सुरू ठेवू इच्छित आहे की नाही ते विचारेल. जर एखादा मेंबर हे सुरू ठेवू इच्छित असेल तर येथून पुढे त्याला त्याची वास्तविक किंमत मोजावी लागेल. जर कोणाला हे सुरू ठेवायचे नसेल तर तो आपल्या जुन्या प्लॅनकडे परत जाईल.

गॅझेट्स ३६० ने नेटफ्लिक्सच्या प्रवक्त्याच्या हवाल्याने सांगितले की, “नेटफ्लिक्सचा आनंद घेता यावी यासाठी कंपनी भारतात नवीन मेंबर्सना जोडण्यासाठी एक वेगळी मार्केटिंग प्रमोशन रणनीति राबवित आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.