सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा जिल्ह्यात शनिवारी रात्री उशिरा आलेल्या कोरोना तपासणीत रिपोर्टमध्ये 804 जण बाधित आढळले आहेत. कोरोनाचा पाॅझिटीव्ह रेट 20. 28 टक्क्यांवर गेल्याने चितेंचे वातावरण काहीशा प्रमाणात कमी होताना दिसत आहे.
गेल्या चोवीस तासात सातारा जिल्ह्यात 3 हजार 964 लोकांची कोरोना तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी 804 लोक बाधित आढळून आले आहेत. आजच्या अहवालात पाॅझिटीव्ह रेट 20 टक्क्यांवर आहे. तर 4 जणांचा मृत्यू झाला आहे.
शनिवारी दिवसभरात 1537 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. काल सायंकाळी जिल्ह्यात विविध ठिकाणी 6698 रूग्ण सक्रीय होते. तर केवळ 408 रूग्ण रूग्णालयात उपरार्थ आहेत. रिकव्हरी रेट 94. 58 टक्के इतकी आहे.