हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । New Business Idea : सध्याच्या महागाईमध्ये फक्त नोकरीमध्येच घर खर्च भागवणे अवघड बनले आहे. अशा वेळी प्रत्येकाला नोकरीबरोबरच एखादा जोड धंदाकरावा असे वाटत आहे. जर आपणही असाच विचार करत असाल तर ही बातमी आपल्यासाठी महत्वाची ठरू शकेल. आज आपण एका अशा व्यवसायाबाबत चर्चा करणार आहोत जो आपण नोकरीसोबतही करू शकाल. चला तर मग त्याविषयी जाणून घेउयात…
आज आपण लाकडी फर्निचरच्या व्यवसायाबाबत बोलणार आहोत. आजकाल बाजारात लाकडी फर्निचरला भरपूर मागणी आहे. घरातील सजावट आणि फर्निचरसाठी लोकं लाकडी वस्तूंना जास्त पसंती देत आहेत. याशिवाय हा व्यवसाय सुरू करणे देखील खूप सोपे आहे. यासोबतच केंद्र सरकारकडून या व्यवसायासाठी कर्ज देखील मिळू शकेल. ज्यामुळे भांडवलाची चिंताही दूर होईल. म्हणूनच हा व्यवसाय फायदेशीर ठरू शकेल. New Business Idea
अशा प्रकारे मिळेल कर्ज
केंद्र सरकारकडून लहान व्यावसायिकांना नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज दिले जाते. याद्वारे आपल्याला व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या रकमेच्या 75-80 टक्क्यांपर्यंत कर्ज मिळेल. New Business Idea
किती खर्च येईल ???
हा व्यवसाय सुरू करण्यासाठी जवळपास 1.85 लाख रुपयांच्या भांडवलाची आवश्यकता असेल. याशिवाय सरकारच्या मुद्रा योजनेंतर्गत कंपोझिट लोन अंतर्गत बँकेकडून सुमारे 7.48 लाख रुपयांचे कर्ज मिळू शकेल. यामध्ये स्थिर भांडवल म्हणून 3.65 लाख रुपये तर तीन महिन्यांसाठी खेळते भांडवल म्हणून 5.70 लाख रुपयांची आवश्यकता असेल. New Business Idea
किती नफा मिळेल ???
जर आपल्याकडे व्यवसायाचे कौशल्य असेल तर अगदी कमी खर्चातही आपले उत्पन्न दुप्पट होऊ शकेल. तसेच या व्यवसायाची खास गोष्ट अशी कि, तो सुरू केल्यानंतरच लगेचच नफा मिळू लागेल. अशा प्रकारे सर्व खर्च जाऊनही दरमहा 60 हजार ते 1 लाख रुपये सहज कमवता येतील. या पैशांच्या मदतीने आपल्या कर्जाची लवकर परतफेड करता येईल. New Business Idea
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.mudra.org.in/
हे पण वाचा :
FD Rates : ‘या’ NBFC ने FD वरील व्याजदरात केली वाढ, नवीन दर तपासा
Train Cancelled : रेल्वेकडून आजही 247 गाड्या रद्द !!! घर सोडण्यापूर्वी रद्द झालेल्या गाड्यांची लिस्ट तपासा
Gold Price Today : सोन्या-चांदी झाले स्वस्त, जाणून घ्या आजचे नवे दर
DCB Bank च्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी, आता FD वर मिळेल 8.35% व्याज
Jio च्या ‘या’ प्लॅनमध्ये 1 वर्षाच्या व्हॅलिडिटीसोबत मिळवा अनलिमिटेड कॉलिंग अन् डेटा