हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । New Business Idea : सध्याच्या काळात अनेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांची कपात करत आहे. ज्यामुळे आज असलेली नोकरी उद्या असेलच याची शाशवती देखील नाही. जर आपणही नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर आजची ही बातमी आपल्यासाठी खूपच उपयुक्त ठरेल. कारण आज आपण एका जबरदस्त व्यवसायाची माहिती जाणून घेणार आहोत जो कधीही फेल होणार नाही. याशिवाय यामध्ये इतका नफा मिळेल जो पाहून आपल्याला आनंदच होईल.
खरं तर, आज आपण केळीपासून चिप्स (New Business Idea) बनवण्याच्या व्यवसाया बाबत जाणून घेणार आहोत. हे जाणून घ्या कि, वर्षभर मागणी असल्याने या व्यवसायाच्या यशाची खात्री देखील देता येईल. याशिवाय याद्वारे चांगले उत्पन्न देखील मिळेल. हा व्यवसाय सुरू करायला खूप सोपा आहे. चला तर मग हा व्यवसाय कसा सुरू करावा ते जाणून घेउयात…
अशा प्रकारे सुरु करा व्यवसाय
केळीपासून चिप्स बनवण्याचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला काही मशीन खरेदी कराव्या लागतील. ज्यामध्ये केळी धुण्याचे आणि सोलण्याचे मशीन, कटिंग मशीन, फ्राईंग मशीन आणि मसाला मिक्सिंग मशीन इ. या मशीन्स बाजारातून किंवा ऑनलाइनही खरेदी करता येतील. यासाठी सुमारे 30 ते 50 हजार रुपये खर्च करावे लागतील. New Business Idea
कच्चा माल
50 किलो चिप्स बनवण्यासाठी 120 किलो केळी लागतील, ज्याची बाजारात किंमत सुमारे 1000 रुपये असेल. तसेच चिप्स तळण्यासाठी आपल्याला 15 लिटर तेल देखील घ्यावे लागेल, ज्याची किंमत बाजारानुसार सुमारे 2500 रुपये असेल. त्याचप्रमाणे मशीन चालवण्यासाठी डिझेल किंवा वीज लागेल. यासोबतच चवीसाठी मीठ आणि मसाले देखील लागतील, ज्याची किंमत सुमारे 200 रुपये असेल. New Business Idea
किती उत्पन्न मिळेल ???
वर दिलेल्या तपशीलानुसार, या व्यवसायामध्ये पॅकेजिंगच्या खर्चासहीत 1 किलो चिप्सच्या पॅकेटची किंमत 70 रुपये असेल. अशा प्रकारे, 50 किलो चिप्स बनवण्यासाठी 3500 रुपये खर्च येईल. ज्याची घाऊक किंमत 100 ते 120 प्रति किलो सहजपणे मिळू शकेल. अशा प्रकारे, जर एका पॅकेटवर 20 रुपये नफा मिळाला तर एका दिवसात 1 हजार रुपये सहजपणे मिळू शकतील. तसेचज जर आपल्या चिप्सचे चांगले मार्केटिंग केले तर आपल्या उत्पन्नात वाढ होईल. New Business Idea
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.mudra.org.in/
हे पण वाचा :
Jio कडून ग्राहकांना धक्का, ‘हा’ रिचार्ज प्लॅन 100 रुपयांनी महागला
Bank Account बंद करताय जरा थांबा… लक्षात घ्या ‘या’ 5 गोष्टी !!!
येत्या 7 दिवसात पूर्ण करा ‘ही’ 5 महत्वाची कामे अन्यथा मिळू शकेल Income Tax ची नोटीस
Xiaomi चे स्मार्टफोन इतके स्वस्त कसे काय ??? कंपनी अशा प्रकारे वसूल करते आपला खर्च
हिंडेनबर्ग रिपोर्टमध्ये शेअर्स डंप केल्याचा आरोप असलेल्या Amrita Ahuja कोण आहेत ? जाणून घ्या त्यांचे भारत कनेक्शन