New Business Idea : उन्हाळ्याच्या दिवसांत ‘या’ वस्तूची विक्री करून मिळवा भरपूर नफा

New Business Idea
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । New Business Idea : थंडीचा हंगाम संपून आता उन्हाळा सुरू झाला आहे. अशा परिस्थितीत उन्हाळ्यामध्ये उपयोगात येणाऱ्या अनेक वस्तूंच्या मागणीमध्ये वाढ होणार आहे. जर आपण एखादा नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर आपल्यासाठी ही एक चांगली संधी ठरेल. आज आपण एका अशा व्यवसायाबाबतची माहिती जाणून घेणार आहोत ज्याला उन्हाळ्यामध्ये भरपूर मागणी असते. हा व्यवसाय सुरू करून मोठा नफा देखील मिळवता येईल.

3 Ways to Expand Your Ice Cream Business Year-Round

खरं तर, आज आपण आईस्क्रीम बनवण्याच्या व्यवसायाबाबत चर्चा करणार आहोत. हे लक्षात घ्या कि, आईस्क्रीम बनवणाऱ्या अनेक कंपन्या आधीपासूनच बाजारात आहेत. मात्र जर आपण चांगल्या दर्जाचे आइस्क्रीम बनवू शकलात तर आपला व्यवसाय हमखास यशस्वी ठरू शकेल. चला तर मग आइस्क्रीम बनवण्याचा व्यवसाय कसा सुरू करायचा ते जाणून घेऊयात… New Business Idea

How To Start An Ice Cream Parlor In India in 2023 - All You Need To Know

‘या’ गोष्टींची आवश्यकता भासेल

हा व्यवसाय सुरू करण्यासाठी फ्रीज, मिक्सर, थर्माकोलचा बर्फाचा कूलर बॉक्स, कूलर कंडेन्सर यांसारख्या काही मशीन्सची गरज भासेल. कच्च्या मालाबाबत बोलायचे झाल्यास यासाठी दूध, दुधाची पावडर, मलई, साखर, लोणी आणि अंडी यांसारख्या गोष्टी आवश्यक असतील. बाजारातून होलसेल दरामध्ये या सर्व गोष्टी सहजरित्या खरेदी करता येऊ शकतील. या व्यतिरिक्त, आपल्याला कलर पावडर आणि फ्लेवर पावडरची देखील आवश्यकता असेल. New Business Idea

Portsoy Ice Cream - Award Winning Homemade Ice Cream

अशाप्रकारे सुरू करा व्यवसाय

सुरुवातीला स्थानिक पातळीवर आईस्क्रीम बनवण्याचा व्यवसाय सुरू करता येईल. यामध्ये युनिट स्थापित करण्याआधी आपल्याला आजूबाजूच्या बाजारपेठेमध्ये सर्व्हे करून ऑर्डरच्या शक्यतेबाबत जाणून घेऊ येईल. तसेच आपल्या आइस्क्रीममध्ये विविधता ग्राहकांचे लक्ष आपल्या ब्रँडकडे आकर्षित करता येईल. त्याचप्रमाणे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी सुरुवातीला आईस्क्रीमची किंमत कमी ठेवणे महत्त्वाचे ठरेल. New Business Idea

Thinking About Opening An Ice Cream Shop? Here's How Much You'll Make

विक्रीसाठी काढावे लागणार लायसन्स

हे लक्षात घ्या कि, बाजारात कोणताही खाद्यपदार्थ विकण्यासाठी FSSAI कडून लायसन्स घ्यावे लागेल. यासाठी ऑनलाइन अर्ज द्यावा लागेल. हा अर्ज दिल्यानंतर आपल्या उत्पादनाची सॅम्पल टेस्ट केली जाईल. यामध्ये पास झाल्यानंतर आपल्याला लायसन्स दिले जाईल. New Business Idea

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.mudra.org.in/

हे पण वाचा :
सेबीच्या बंदीनंतर अभिनेता Arshad Warsi चे स्पष्टीकरण, ट्विटरवर लोकांना केले आवाहन
लवकरच मुंबई-गोवा मार्गावरही धावणार Vande Bharat Train, केंद्रीय मंत्र्यांनी दिली माहिती
Yes Bank चे गुंतवणूकदार गोंधळात, 3 वर्षांनंतर पुन्हा पाहावे लागणार तेच दिवस ???
Amazon चा जबरदस्त डिस्काउंट !!! 20 हजारांपेक्षा कमी किंमतींत मिळवा 95 हजारांचा ‘हा’ स्मार्टफोन
Gold Hallmarking : सोने खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी !!! 1 एप्रिलपासून लागू होणार मोठा बदल