हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील राजकारणात आता नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवत उद्या बहुमत सिद्ध करा, असे सांगितले आहे. त्यामुळे शिवसेनेकडून हालचाली वाढवण्यात आल्या आहेत. तर दुसरीकडे भाजपने देखील आता सत्ता स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहे. अशातच देवेंद्र फडणवीस हे लवकरच मुख्यमंत्री होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान 1 जुलै रोजी नवे सरकार स्थापन होणार असून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मोठ्या प्रमाणात राजकीय घडामोडीना वेग आला असल्याने राज्यपालांच्या पत्रानंतर आता शिवसेनेकडूनही सुप्रीम कोर्टात बहुमताच्या ठरावाविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. तर दुसरीकडे भाजपकडूनही सत्ता स्थापन करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. उद्या बंडखोर आमदारांच्या साह्याने भाजपने बहुमत सिद्ध केल्यास १ जुलै रोजी नव्या सरकारचा शपथविधी पार पडेल. आणि मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस शपथ घेतील.
जनतेलाही पाहता येणार उद्याची बहुमत चाचणी
राज्यपालांनी दिलेल्या पत्रानंतर उध्या ठाकरे सरकार व शिवसेनेला आपले बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. विशेष म्हणजे जर उद्या बहुमत चाचणी झाली तर ती चाचणी महाराष्ट्रातील जनतेलाही पाहता येणार आहे. बहुमत सिद्ध करण्यासाठी उघड मतदान होणार असल्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी स्पष्ट केले आहे.