कोरोनाच्या नव्या व्हेरीऍंटचा धोका; राज्य सरकारने जारी केली नवी नियमावली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दक्षिण आफ्रिकेत नवा कोरोना विषाणू आढळल्याने जगापुढे आता नवे संकट उभे राहिले आहे. दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाच्या नव्या विषाणूच्या वेरिएंटसंदर्भात भारत देशातील राज्यांना सतर्क राहण्याच्या सूचनाही आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केल्यानंतर राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. तसेच नवीन नियमावलीही जारी केलेली आहे. ती म्हणजे लसीचे दोन डोस घेतल्याशिवाय आता महाराष्ट्रातील लोकांना सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करता येणार नाही. राज्य सरकारच्या या निर्णयानुसार, लसीकरण पूर्ण झालेल्या व्यक्तींना आता सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करण्यास परवानगी असणार आहे. तो म्हणजे लसीचे दोन डोस घेतल्याशिवाय आता महाराष्ट्रातीळ लोकांना सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करता येणार नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महत्वपूर्ण बैठक घेतल्यानंतर नव्या कोरोनाच्या व्हेरिएंट विषाणूसंदर्भात देशातील सर्वच राज्यातील सरकारने खबरदारी घ्यावी, अशा सूचना दिल्या आहेत. पंतप्रधान मोदींच्या सूचनेनंतर महाराष्ट्र सरकारने तत्काळ महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने याबाबत नवी नियमावली जारी केली आहे.

अशी आहे राज्य सरकारची नवीन नियमावली –

1) मुंबईतील लोकल ट्रेनप्रमाणे एसटी, बससेवा, टॅक्सी, रिक्षा या वाहतुकीने प्रवास करायचा असेल तर दोन डोस घेतलेल्या व्यक्तींनाच परवानगी दिली जाणार आहे.

2) कोरोनाचे नियम न पाळणार्‍यांविरुद्ध दंडाची व्याप्ती वाढवण्यात येणार आहे.

3) रिक्षा, टॅक्सीत बसलेल्या प्रवाशाने मास्कचा वापर केला नसेल तर प्रवाशाला 500 रुपये आणि रिक्षा-टॅक्सी चालकालाही 500 रुपये दंड आकारला जाणार आहे.

4) दुकानात आलेल्या ग्राहकाने मास्क घातला नसेल तर ग्राहकाला 500, तर संबंधित दुकानदाराला 10 हजार रुपये दंड आकारला जाणार आहे.

5) मॉल्समध्ये ग्राहकांच्या चेहऱ्यावर मास्क नसेल तर मॉल्सच्या मालकाला तब्बल 50 हजार रुपयांचा फटका बसणार आहे.

6) राजकीय सभांना, जाहीर कार्यक्रमांना परवानगी देण्यात आली आहे.

7) नियम न न पाळणाऱ्या आयोजकांवर 50 हजार दंड आकारण्याबरोबर कार्यक्रम बंद करण्याचा अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात आला आहे.