हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । New Labour Codes : केंद्र सरकारकडून लवकरच देशभरात चार नवीन कामगार संहिता लागू केली जाऊ शकेल. ज्यानंतर कर्मचाऱ्यांचे पगार, रजा, पीएफ आणि ग्रॅच्युइटी यासह अनेक गोष्टींमध्ये बदल होतील. याबरोबरच सरकार कडून ग्रॅच्युइटीसाठी एखाद्या संस्थेत 5 वर्षे सतत काम करण्याचे बंधन काढून एक वर्ष केले जाऊ शकेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, सरकारने अद्याप याबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही.
या नवीन संहिता लागू झाल्यानंतर आता कोणत्याही संस्थेत वर्षभर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील ग्रॅच्युइटी मिळेल. ग्रॅच्युइटीच्या या नियमात बदल झाल्याचा फायदा करोडो कर्मचाऱ्यांना होणार आहे. ग्रॅच्युइटी म्हणजे कंपनीकडून कर्मचाऱ्याला दिले जाणारे बक्षीस. हे जाणून घ्या कि, कर्मचाऱ्याने नोकरीच्या काही अटी पूर्ण केल्यास त्याला संबंधित संस्थेकडून ग्रॅच्युइटी दिली जाते. New Labour Codes
ग्रॅच्युइटी कोणाला दिली जाते ???
पेमेंट ऑफ ग्रॅच्युइटी कायदा, 1972 अंतर्गत 10 पेक्षा जास्त कर्मचारी काम करत असलेल्या संस्थेच्या प्रत्येक कर्मचाऱ्याला ग्रॅच्युइटीचा लाभ मिळतो. याबरोबरच एखाद्या संस्थेत सलग पाच वर्षे काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला देखील हा लाभ दिला जातो. जर एखाद्या कर्मचाऱ्याने आपली नोकरी बदलली किंवा तो रिटायर झाला किंवा कोणत्याही कारणास्तव जर त्याने नोकरी सोडली असेल, मात्र तो ग्रॅच्युइटीचे नियम पूर्ण करत असेल तर त्याला हा लाभ मिळतो. New Labour Codes
आता ग्रॅच्युइटीचे गणित कसे आहे ???
कर्मचाऱ्याला किती ग्रॅच्युइटी मिळेल यासाठीचे एक सूत्र आहे. यासाठी एका महिन्याचे फक्त 26 दिवस मोजले जातात कारण 4 दिवस सुट्ट्या असतात. त्याच वेळी, ग्रॅच्युइटीचे कॅल्क्युलेशन वर्षातील 15 दिवसांच्या आधारे केली जाते. New Labour Codes
एकूण ग्रॅच्युइटीची रक्कम = (अंतिम वेतन) x (15/26) x (कंपनीमध्ये नोकरी केलेली वर्षे).
जर एखाद्याने एकाच कंपनीत 20 वर्षे काम केले असेल आणि त्या कर्मचाऱ्याचा शेवटचा पगार 75000 रुपये असेल (बेसिक सॅलरी आणि महागाई भत्त्यासह). अशा प्रकारे कॅल्क्युलेशन केले जाईल.
ग्रॅच्युइटीची एकूण रक्कम = (75000) x (15/26) x (20) = 865385 रुपये. अशा प्रकारे, कर्मचाऱ्याला 8,65,385 रुपये ग्रॅच्युइटी म्हणून मिळतील. New Labour Codes
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://labour.gov.in/sites/default/files/Labour_Code_Eng.pdf
हे पण वाचा :
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये ज्येष्ठ नागरिकांना मिळेल जास्त रिटर्न !!!
WhatsApp द्वारे Android फोनवरून टायपिंग न करता पाठवा मेसेज !!!
Voter ID मधील घराचा पत्ता कसा बदलावा हे समजून घ्या
PM Kisan च्या 11 वा हफ्त्याचे पैसे मिळवण्यासाठी ‘या’ नंबर करा तक्रार !!!
‘या’ Multibagger Stock ने गुंतवणूकदारांना 1 वर्षात दिला 960 टक्के रिटर्न !!!