प्योन्ग यांग । उत्तर कोरियामध्ये हुकूमशाही निर्णयासाठी ओळखला जाणारा सुप्रीम कमांडर किम जोंग उन याने आपल्या देशातील नियम आणखी कडक केले आहेत. काही काळापूर्वी उत्तर कोरियामध्ये एक कायदा करण्यात आला आहे, त्यानुसार जर कोणतीही व्यक्ती दक्षिण कोरिया, अमेरिका आणि जपानच्या माध्यमांशी संबंधित कंटेन्ट शेअर करत असेल तर त्याला मृत्युदंडाची शिक्षा ठोठावली जाऊ शकते.
दक्षिण कोरियामध्ये प्रचलित शब्द आणि सामान्य भाषेचा देखील या बंदीच्या लिस्टमध्ये समावेश आहे. दक्षिण कोरियाची हेयरस्टायल आणि विदेशी फॅशनवर या आधीच बंदी आहे. लोकांना सांगितले गेले आहे की, उत्तर कोरियाची भाषा सर्वात चांगली आहे आणि दक्षिण कोरियामध्ये वापरली जाणारी भाषा वापरल्यामुळे त्यांना फाशीची शिक्षा भोगावी लागू शकते.
उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंगने हे देखील जाहीर केले आहे की, जर कोणी दक्षिण कोरिया, जपान आणि अमेरिकेच्या माध्यमांना फॉलो करत असल्याचे आढळले तर त्याला 15 वर्ष तुरूंगात घालवावे लागतील. उत्तर कोरियाच्या वृत्तपत्र रोडॉंग सिनमन यांनी दक्षिण कोरियाच्या पॉप संस्कृतीच्या धोक्यांविषयी लिहिले आहे की, रंगीबेरंगी कपड्यांमध्ये दिसणारी लोकं आत प्रवेश करून आपली संस्कृती नष्ट करू इच्छित आहेत. ज्यांच्या हातात बंदूक आहे त्यांच्यापेक्षा ही लोकं अधिक धोकादायक आहेत.
यूनिव्हर्सिटी ऑफ नॉर्थ कोरियन स्टडीजचे प्रोफेसर यांग मू-जिनने कोरिया हेराल्डला सांगितले की,” किम जोंग उन स्वत: स्वित्झर्लंडमध्ये शिकले आहेत, परंतु त्यांना हे माहित आहे की, कोरियन पॉप संगीत आणि पाश्चात्य संस्कृती उत्तर कोरियामधील तरुणांवर सहजपणे प्रभाव पाडू शकते.” प्रोफेसर यांग मू-जिन पुढे म्हणाले की,” किमला माहित आहे की, त्याचा त्याच्या समाजवादी व्यवस्थेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. तरुण लोकं बंडखोर होऊ शकतात. यामुळेच ते तेथील पॉप संस्कृती, संगीत आणि इतर देशांच्या माध्यमांना त्यांच्या देशात प्रचलित होऊ देऊ इच्छित नाही.”
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा