हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Income Tax : इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून नुकताच कर सवलती बाबत एक नवा आदेश जारी करून करदात्यांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. या नव्या आदेशानुसार आता करदात्यांना उपचारासाठी मिळणाऱ्या रकमेवर इन्कम टॅक्समध्ये सूट दिली जाणार आहे. हे लक्षात घ्या कि, इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून करदात्यांच्या सोयीसाठी वेळोवेळी नियमांमध्ये बदल केले जात असतात.
अलीकडेच, सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) ने नवीन अटी आणि कोविड-19 उपचारांवर खर्च केलेल्या रकमेवर देखील Income Tax मध्ये सूट मिळण्यासाठी क्लेम करण्याबाबत एक फॉर्म जारी केला आहे. 5 ऑगस्ट 2022 च्या एका अधिसूचनेनुसार, आता आपल्याला नियोक्त्याकडे काही कागदपत्रे आणि एक फॉर्म इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडे सबमिट करावा लागेल, ज्यामध्ये नियोक्ता किंवा नातेवाईकांकडून कोविडच्या उपचारासाठी मिळालेल्या रकमेवरही कर सूट मिळू शकेल.
आजपासून नवीन नियम लागू
केंद्र सरकारकडून गेल्या वर्षीच जाहीर करण्यात आले होते की, कोविड-19 उपचारांसाठी किंवा कोविड-19 मुळे मृत्यू झाल्यास कुटुंबातील सदस्यांकडून मिळालेल्या एक्स-ग्रेशियावर Income Tax आकारला जाणार नाही. 2022 च्या अर्थसंकल्पातही याबाबत अधिसूचित करण्यात आले होते. हे लक्षात घ्या कि, 2019-2020 या आर्थिक वर्षापासून ही सूट लागू झाली आहे. याशिवाय इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने कोणत्याही प्रकारच्या तक्रारींचा लवकर निपटारा करण्यासाठी समित्या स्थापन करण्याची देखील घोषणा केली होती.
डिजिटल पद्धतीने केले जाणार सर्व कामे
लोकांच्या सोयीसाठी आणि डिजिटायझेशनला चालना देण्याच्या उद्देशाने Income Tax डिपार्टमेंटने कर सवलत मिळवण्यासाठी आवश्यक असलेले फॉर्म डिजिटल केले होते. यासोबतच आता आपल्याला अनेक कामांसाठी कार्यालयात हेलपाटे मारण्याची गरज भासणार नाही.
टॅक्स कलेक्शनमध्ये 24 टक्क्यांनी वाढ
हे लक्षात घ्या कि, चालू आर्थिक वर्षात, एप्रिल ते नोव्हेंबर दरम्यान, नेट डायरेक्ट टॅक्स कलेक्शन 24 टक्क्यांनी वाढून 8.77 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून नुकतीच याबाबत माहिती देण्यात आली आहे. हे टॅक्स कलेक्शन संपूर्ण वर्ष 2022-23 च्या अंदाजपत्रकाच्या 61.79 टक्के आहे. मंत्रालयाने सोशल मीडियाद्वारे सांगितले की, “30 नोव्हेंबरपर्यंत नेट डायरेक्ट टॅक्स कलेक्शन 8.77 लाख कोटी रुपये होते, जे मागील वर्षीच्या याच कालावधीतील नेट कलेक्शन पेक्षा 24.26 टक्के जास्त आहे.”
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://incometaxindia.gov.in/Pages/default.aspx
हे पण वाचा :
Union Bank of India कडून ग्राहकांना धक्का, होमलोनवरील EMI वाढणार
Train Cancelled : रेल्वेकडून आज 271 गाड्या रद्द !!! अशा प्रकारे तपासा रद्द झालेल्या गाड्यांची लिस्ट
Stock Tips : आगामी काळात ‘हे’ 5 स्टॉक देऊ शकतील मोठा रिटर्न, आपल्या प्रोफोलिओमध्ये आजच करा समावेश
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमती वधारल्या, आजचे दर तपासा
Indian Overseas Bank च्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी, FD वर मिळणार जास्त व्याज