हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | शहरामधील वाढत्या वाहतुकीला तोंड देण्यासाठी शासनाकडून नव – नवी पावले उचलली जात आहेत. त्यातच आता वसई – विरारचा सागरी सेतू मार्ग (Vasai Virar Sea Link) हा पालघर पर्यंत विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा प्रकल्प याआधी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून केला जाणार होता. मात्र आता तो मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या हाती देण्यात आला आहे. हा मार्ग कसा असेल याबाबत जाणून घेऊयात.
42.75 किलोमीटरचा असेल मार्ग
वसई – विरारचा विस्तार हा सागरी सेतूद्वारे पालघर पर्यंत केला जाणार आहे. याची लांबी ही एकूण 42.75 किलोमीटर असणार आहे. यासाठी 63 हजार 426 कोटींचा खर्च आहे. याआधी हा प्रकल्प महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे होता त्यासाठी त्यांनी 32 हजार कोटी रुपये मंजूर केले होते. परंतु हा प्रकल्प एमएमआरडीए कडे गेला आणि या प्रकल्पाच्या व्यवहार्यता सल्ल्याबाबत मेसर्स पेंटॅकल-सेमोसा या कंपनीची नियुक्ती केली. आणि त्यानुसार प्रकल्पाचा खर्च काढण्यात आला. या संदर्भातला अहवाल 19 नोव्हेंबर 2022 रोजी काढण्यात आला होता. आता यावर काम सुरु असून याबाबत निविदा काढल्या जात आहेत.
कोणत्या ठिकाणाला जोडला जाईल हा मार्ग?
या सागरी सेतू महामार्गाला वसई, विरार, भाईंदर – मिरा, चारकोप या चार ठिकाणाला जोडला जाणार आहे. त्यासाठी विशेष रॅम्प व मार्गिका उभी केली जाणार आहे. त्यानुसार या सेतूची एकूण लांबी ही 52 किलोमीटर पर्यंत असणार आहे. एवढेच नव्हे तर हा मार्ग मुंबई-अहमदाबाद महामार्गालादेखील संलग्नता देणार आहे. त्यामुळे हा विस्तार वाहतुकीला चालना देणार आहे. असे म्हणायला हरकत नाही.