शरद पवारांनी मोदींसोबत यावं, यासाठी अजित पवार प्रयत्नशील! एका नव्या दाव्याने राजकारणात खळबळ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| गेल्या दोन दिवसात राष्ट्रवादी पक्षात अनेक घडामोडी घडल्याचे दिसून येत आहे. काल राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार हे लगेच दिल्लीला केंद्रीय मंत्री अमित शहा यांना भेटायला गेल्यामुळे राजकिय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. मुख्य म्हणजे, त्यांच्या या भेटीनंतर आमदार रवी राणा मोठा गौप्यस्फोट केला आहे. शरद पवारांनी (Sharad Pawar) पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत यावं, यासाठी अजित पवार (Ajit Pawar) प्रयत्नशील असल्याचे रवी राणा यांनी म्हटले आहे.

रवी राणा यांनी म्हणले आहे की, “शरद पवार हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते आहेत. अजित पवार हे सातत्याने शरद पवारांना मोदींसोबत सत्तेत येण्यासाठी प्रयत्न करत आहेत. शरद पवार देखील यामुळे तयार झाले असतील असं मला वाटते. अजित पवार आणि अमित शहा यांच्या भेटीत भेटीत अनेक रहस्य दडलेले आहेत. राजकारणात अनेक घडामोडी घडत असतात. येणाऱ्या काळातही काही घडामोडी घडणार आहेत. शरद पवार मोदीजींचे काम बघून त्यांना नक्कीच पाठिंबा देतील”

त्याचबरोबर, “राज्याच्या विकासासाठी पवार साहेब मोदीजींना पाठिंबा देतील आणि राज्य सरकार मजबूत करतील असं चित्र सध्या दिसत आहे. निवडणुकांपूर्वी अनेक घडामोडी घडणार आहेत. काँग्रेसचे अनेक नेते आपल्याला भाजपसोबत दिसतील. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सुद्धा आपल्याला मोदीजींसोबत दिसतील” असा गौप्यस्फोट रवी राणा यांनी केला आहे.

दरम्यान, शुक्रवारी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची भेट घेतल्यानंतर अजित पवार तातडीने अमित शहा यांना भेटण्यासाठी दिल्लीला रवाना झाले होते. दिल्लीत गेल्यानंतर अजित पवार यांनी प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांची अमित शहांबरोबर बैठक पार पडली. या बैठकीमध्ये मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण आणि मंत्रिमंडळाचा विस्तार याबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. मात्र अद्याप या याबाबत कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही.