Saturday, February 4, 2023

नूतन पोलीस अधीक्षक निमित गोयल यांनी स्वीकारला पदभार

- Advertisement -

औरंगाबाद – औरंगाबादच्या ग्रामीण पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या जागी नवे पोलीस अधीक्षक निमित गोयल यांनी काल पदभार स्वीकारला. काही दिवसापूर्वीच औरंगाबादच्या ग्रामीण पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांची बदली झाली होती. त्यांच्या जागी निमित गोयल यांची नियुक्ती झाली आहे. नवे पोलीस अधीक्षक निमित गोयल यांनी पदभार स्वीकारला. गणेशोत्सव पार पडल्यानंतर निमित गोयल यांनी कारभार हाती घेतला. मोक्षदा पाटील यांची बदली लोहमार्ग पोलीस अधीक्षक, औरंगाबाद विभागात करण्यात आली आहे.

औरंगाबाद पोलिस दलात ‘महिलाराज’
औरंगाबाद शहरातील पाच महत्त्वाच्या पदांवर वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली आहे. त्यामुळे औरंगाबादच्या पोलिसदलात नारीशक्तीचे दर्शन घडणार आहे. नव्याने झालेल्या बदल्यांनुसार, औरंगाबाद लोहमार्ग पोलीस अधीक्षकपदी मोक्षदा पाटील यांची बदली झाली आहे.

- Advertisement -

तसेच शर्मिला घार्गे या औरंगाबाद गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधीक्षकपदी असतील. तसेच राज्य गुप्तवार्ता विभागात मीना मकवाना या उपायुक्त पदावर असतील. उज्ज्वला वनकर आणि अपर्णा गीते या शहर पोलिस उपायक्तपदाची धुरा हाती घेतील. यामुळे सध्या तरी औरंगाबाद पोलीस दलात महिलाराज असल्याचे दिसून येत आहे.