Thursday, February 2, 2023

कोल्हापूरचा हा पहिलवान गडी कुणाला ऐकणार नाही; हसन मुश्रीफांसाठी संजय राऊतांची बॅटिंग

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर घोटाळ्याचा आरोप केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं असून महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे. याच पार्श्वभूमीवर आजच्या सामना अग्रलेखातुन शिवसेनेने हसन मुश्रीफ यांचं समर्थन केल्याचं दिसत आहे. कोल्हापूरचा हा पहिलवान गडी कुणाला ऐकणार नाही, असे शिवसेनेने म्हंटल आहे.

भाजपचे माजी खासदार सोमय्या यांचे आरोप व बाता या नागपूरच्या गोटमारीसारख्याच आहेत. ज्यांच्यावर आरोप केले जात आहेत त्यातील अनेकांनी त्यांना कोर्टात खेचले आहे. कोल्हापूरचा पहेलवान गडी मुश्रीफ तर कुणाला ऐकणार नाही, अशा शब्दात त्यांनी सोमय्यांवर टीका करत मुश्रीफ यांचे समर्थन केले आहे.

- Advertisement -

ईडी’शी लढताना तोंडाला फेस येईल, अशी धमकी चंद्रकांत पाटलांनी मुश्रीफांना दिली. त्यांच्या याच धमकीला राऊतांनी उत्तर दिलंय. चंद्रकांत पाटील यांना कोल्हापुरातून पळ काढून कोथरुडला जाऊन निवडणूक लढवावी लागली. कोथरुडला विजय मिळविताना पाटलांच्याही तोंडाला तसा फेसच फेस आला होता, असा टोला राऊतांनी लगावला.