हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आता लवकरच राज्यातून टोल यंत्रणा हद्दपार होणार आहे. कारण की, सरकार प्रवाशांचा वेळ वाचवण्यासाठी टोल यंत्रणा रद्द करून त्या जागी नवीन प्रणाली आणण्याचा विचार करत आहे. याबाबतची माहिती केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी दिली आहे. त्यांनी म्हणले आहे की, या नव्या प्रणालीच्या माध्यमातून चालकांकडून टोल वसुली (Toll collection) केली जाईल. यामध्ये चालक महामार्गावर जेवढे किलोमिटर अंतर पार कापतील, तेवढेच टोल त्यांच्याकडून घेण्यात येतील.
नितीन गडकरींकडून सांगण्यात आलेली ही नवी प्रणाली मार्च 2024 पर्यंत लागू करण्याचे उद्दिष्ट होते. परंतु पुढील डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीपर्यंत या प्रणालीला सेवेत आणले जाईल. या नव्या प्रणालीमुळे टोल प्लाझावर लागणारा वेळ ही कमी होईल. तसेच, प्रवासी महामार्गावर जितक्या किमीपर्यंत प्रवास करतील तितकाच टोल त्यांच्याकडून वसूल केला जाईल. हा टोल प्रवाशांच्या थेट बँक अकाउंटमधून कट करण्यात येईल. यामुळे युजर्संना सेव्हिंगची संधी उपलब्ध होईल.
खास म्हणजे, ही नवी प्रणाली सेटेलाइटवर आधारित असणार आहे. जिच्यामुळे प्रवाशांकडून टोल वसुली करण्याचा वेळही वाचेल. त्याचबरोबर, कोणत्याही टोल नाक्यावर एखाद्या प्रवाशांकडून अधिक पैसे वसूल करण्याचे प्रकार घडणार नाहीत. दरम्यान, अद्याप नॅशनल हायवे ऑथोरिटी ऑफ इंडियाने ही नवी प्रणाली नेमकी कधी सेवेत आणली जाईल याबाबतची कोणतीही ठोस माहिती दिलेली नाही. परंतु डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीपर्यंत सर्व टोल नाक्यांवर ही नवी प्रणाली उपलब्ध असेल अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली आहे.