हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दुचाकी चालवताना एखाद्या वाहतूक पोलीसाने आपल्याला पकडू नये म्हणून काहीजण सोबत हेल्मेट घेऊन प्रवास करतात. मात्र, आता हेल्मेट घातलयावरही पोलिसांकडून दंड केला जाणार आहे. वाहतुक विभागाच्या हेल्मेटमधील नियमात आता अजून एक नवीन नियम घालण्यात आला आहे की, या नियमांमुळे हेल्मेट सोबत असताना आणि तो जर नीट घातला नसेल तर 2 हजार रुपयांचा दंड तुम्हाला भरावा लागणार आहे. पाहू या काय आहे तो नवीन नियम…
रस्ते अपघातांवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारने मोटर वाहन अॅक्ट १९९८ मध्ये मोठे बदल करण्यात आले असून या कायद्यात हेल्मेटचा नियम लागू करण्यात आला आहे. भारतात दोन चाकी वाहनांच्या अपघाताची संख्या वाढली आहे. यात अनेकांना जीव गमवावा लागत आहे. देशात अपघाताच्या बाबतीत नागरिक अजुनही गंभीर झालेले नाहीत. हेल्मेट सोबत ठेवतात पण त्याचा वापर केला जात नाही. त्यामुळे आता यावर नवे नियम लागू केले आहेत.
वाहन चालकाने हेल्मेट घातले असेल पण ते योग्य पध्दतीने घातले नाहीतर त्याच्याकडून २ हजारांचा दंड वसुल केला जावू शकतो. जास्त वजनाच्या गाड्यांविरोधातही सरकारने नवे नियम लागू केले आहेत.
नवीन नियममध्ये नेमकं काय म्हंटल आहे?
मोटार वाहन कायद्यानुसार आपण मोटारसायकल किंवा स्कूटर चालवताना हेल्मेटची स्ट्रीप लावलेली नसेल तर नियम 194D MVA नुसार तुम्हाला 1 हजार रुपयांचा दंड भरावा लागू शकतो. यासह तुम्ही BIS मार्क नसलेले हेल्मेट घातले असेल तर याच नियमानुसार तुम्हाला 1 हजार रुपयांचा दंड होऊ शकतो. अशा प्रकारे नियमाचे पालन न केल्यास याच नियमांतर्गत तुम्हाला 2 हजार रुपयांचा दंड होऊ शकतो.
तर होईल 20 हजार रुपयांपर्यंत दंड…
वाहतूकी सुरक्षिततेच्या व वाहनचालकाच्या दृष्टीने तयार करण्यात आलेल्या नवीन मोटार वाहन कायद्यानुसार तुमचे वाहन ओव्हर लोडेड असेल तर तुम्हाला 20 हजार रुपये इतका दंड होऊ शकतो. शिवाय प्रति टन 2 हजार रुपये दंड देखील द्यावा लागेल. या पूर्वी देखील ओव्हर लोडेड वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे.