Monday, January 30, 2023

शिंदेंच्या बंडामागे ‘हा’ नेता? स्वतःच केला खुलासा

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जून 2022मध्ये एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह 40 आमदारांनी शिवसेनेतून बंडखोरी केल्याने महाविकास आघाडी सरकार कोसळले आणि शिंदे फडणवीस सरकार राज्यात स्थापन झालं. मात्र एकनाथ शिंदेंच्या डोक्यात उठावाची बिजे आपणच पेरली असा दावा शिंदे गटातील नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी केला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.

एका भाषणात बोलताना शिवतारे म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी निवडणुकीपूर्वीच ठरवली. महाविकास आघाडी सरकार महाराष्ट्राच्या हिताचे नव्हतं. पहिल्या दोन महिन्यातच मी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात उचल खाल्ली होती. त्यानंतर दोन महिन्यानंतरच मी नंदनवनला गेलो होतो. एकनाथ शिंदे यांच्याशी साडेचार तास चर्चा केली आणि त्यांच्या मनात उठावाची बीज पेरलं. तुम्ही उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) प्रेशर टाका आणि हे तोडायला लावा. राज्यात पुन्हा भाजप आणि शकिवसेनेचे सरकार आले पाहिजे असं आपण शिंदेंना सांगितलं होत असं शिवतारे म्हणाले.

- Advertisement -

यावेळी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधला. उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या 70 जागा पाडल्या. उद्धव ठाकरेंनी भाजपच्या मतदारसंघात माणसं कामाला लावली. त्यामुळे भाजपनेही शिवसेनेचे मंत्री पाडले. उद्धव ठाकरेच या सर्व गोष्टींना फक्त जबाबदार आहेत,असा आरोप विजय शिवतारे यांनी केला.