हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगात कोरोना विषाणू आणि मंकीपॉक्स सारख्या रोगाने चांगलेच थैमान घातले होते. यामध्ये मोठ्या प्रमाणात लोकांना जीव गमवावा लागला. यातून जग सावरतो ना सावरतो आता चीनमध्ये झुनोटिक लंग्या या नावाचा भयंकर विषाणू आढळून आला आहे. चीनमध्ये आतापर्यंत 35 लोकांना या विषाणूची लागण झाली आहे. या व्हायरसची काही खास अशी लक्षणे आहेत. तैवानच्या रोग नियंत्रण केंद्राने (CDC) माहिती दिली आहे.
लांग्या हेनिपा विषाणू चीनच्या शेंडोंग आणि हेनान प्रांतात आढळून आला आहे आणि तो प्राण्यांपासून मानवांमध्ये पसरतो. अशा प्रकाराच्या नव्ह्या प्रकारच्या व्हायरसमुळे सध्या येथील लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Langya Virus च्या रुग्णांमध्ये आढळून आली ‘ही’ लक्षणे
लांग्या विषाणूची लागण झालेल्या 26 रुग्णांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने ताप, थकवा, खोकला, भूक न लागणे, स्नायू दुखणे, मळमळ, डोकेदुखी, उलट्या ही लक्षणे दिसून आली. त्यांच्यामध्ये पांढऱ्या रक्तपेशींचे प्रमाणही कमी झाले होते. यासोबतच प्लेटलेट्स कमी होणे, यकृत निकामी होणे, किडनी निकामी होणे या गोष्टीही समोर आल्या.
चाचणीत महत्वाची माहिती –
लंग्या हेनिपा विषाणूची लागण झालेल्या 35 जणांची चाचणी करण्यात आली असून त्यांच्या चाचणीत 26 जणांनाच लंग्या विषाणूची लागण झाल्याचे आढळून आले आहे. या 35 लोकांचा एकमेकांशी कोणत्याही प्रकारचा जवळचा संबंध नाही. या चाचणीतून हा व्हायरस सध्या जवळच्या संपर्कात असलेल्यांना संक्रमित करत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
Zoonotic Langya Virus किती आहे धोकादायक?
तैवानच्या सीडीसीचे उपमहासंचालक चुआंग झेन-हसियांग यांनी रविवारी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितले की, एका अभ्यासानुसार, विषाणूचा लोकांपासून लोकांमध्ये मानवी स्वरूपात प्रसार अद्याप झालेला नाही. तसेच सीडीसीला अद्याप हा विषाणू मानवांमध्ये प्रसारित केला जाऊ शकतो की नाही हे निश्चित करणे बाकी आहे. त्यांनी लोकांना व्हायरसबद्दलच्या पुढील अपडेट्सकडे लक्ष देण्याची चेतावणी दिली. पाळीव प्राण्यांवर केलेल्या सेरोलॉजिकल सर्वेक्षणाची माहिती देताना ते म्हणाले की, दोन टक्के शेळ्या आणि पाच टक्के कुत्र्यांना या विषाणूची लागण झाल्याचे आढळून आले.