नवजात बालकाने ‘या’ खास फोटोद्वारे जन्मताच दिले शुभसंकेत ; लवकरच कोरोना जाणार??

baby mask
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोना वायरसने जगभर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. जगभरात कोरोना रुग्णांची एकूण संख्या 3 कोटींच्या वर गेली आहे. कोरोना वर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने मास्कचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे तसेच सॅनिटायजरने सतत हात धुवायला सांगितलं आहे.अशातच एका नवजात बाळाचा फोटो सोशल मीडियावर सुपरहिट ठरला आहे.

जगातील सर्वच देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असताना एका तान्हुल्याचा फोटो “शुभ संकेत” ठरत आहे. सोशल मीडियावर नवजात बाळाचा हा फोटो जोरदार व्हायरल झाला आहे. नुकतेच जन्माला आलेले बाळ डॉक्टरच्या चेहऱ्यावरील मास्क काढत असल्याचं फोटोमध्ये पाहायला मिळत आहे. बाळाची ही कृती शुभ संकेत असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे. हा फोटो शुभ संकेत असून लवकरच संपूर्ण जगाची मास्कपासून सुटका होणार असल्याचा विश्वास काहींनी व्यक्त केला आहे.

https://www.instagram.com/p/CF9nlvZJYDT/?utm_source=ig_web_copy_link

संयुक्त अरब अमिरातीमधील गायनोकॉलोजिस्ट डॉ. सामीर चेईब यांनी हा फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून काही दिवसांपूर्वीच शेअर केला आहे. बाळाचा जन्म झाल्यानंतर डॉ. सामीर यांनी त्याला हातात घेतलं. त्यावेळी नवजात बाळाने त्यांच्या चेहऱ्यावरील मास्क पकडले आणि खेचले.

सोशल मीडियावर बाळाचा हा फोटो सुपरहिट ठरला असून त्याला हजारो लाईक्स मिळाल्या आहेत. नेटिझन्सनी देखील खास फोटोला चांगला प्रतिसाद दिला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’