Tuesday, June 6, 2023

जिल्ह्यात नाईट कर्फ्यू : सेलिब्रेशनला 9 नंतर घराबाहेर पडल्यास पोलिस कारवाई होणार

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

अोमिक्राॅनच्या पार्श्वभूमीवर शासनाने रात्री 9 नंतर नाईट कर्फ्यू घातलेली आहे. त्यामुळे आज 31 डिसेंबर सरत्या वर्षाला निरोप देताना 9 नंतर बाहेर फिरताना आढळल्यास पोलिसांकडून दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पोलिस प्रमुख अजयकुमार बंसल यांनी सांगितले.

श्री. बसंल म्हणाले, लोकांनी 31 डिसेंबर तसेच 1 जानेवारी या नववर्षाचे स्वागत हे घरातच करावे. जिल्ह्यात पोलिस हाॅटेल, पर्यटनस्थळ येथे लक्ष ठेवून आहेत. कास, महाबळेश्वर, ठोसेघर, कोयनानगर, यवतेश्वर यासारख्या पर्यटन स्थळांवरही पोलिसांची नजर राहणार आहे. रात्री 9 नंतर चारपेक्षा जास्त लोक आढळल्यास पोलिसांकडून कारवाई होणार आहे. रस्त्यांवर ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार आहे.

कोरोनासोबत अोमिक्राॅनच्या व्हायरसमुळे नियमांचे पालन करावे. तसेच घरातील लोकांसोबत सेलिब्रेशन करावे. मात्र घरात, तसेच खासगी जागेत मोठ्या प्रमाणावर आयोजन केल्याचे आढळून आल्यास त्याच्यावरही कारवाई केली जाणार आहे. जिल्ह्यात नाईट कर्फ्यू असल्याने 9 नंतर घराबाहेर पडू नये, अन्यथा पोलिस कारवाईला सामोरे जावे लागेल असे पोलिस अधिक्षक अजय कुमार बंसल यांनी सांगितले.