सत्ताधाऱ्यांचा कचऱ्यातून, गु-आतून पैसै काढायचा उद्योग : आ. शिवेंद्रसिंहराजे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सत्ताधाऱ्यांनी नुसती बिले काढून कमिशन घेतले. घंटागाडीकडूनही कमिशन घ्यायचे. घंटागाडीवाले सुरूवातीलाच वर्षात दोनदा आत्महत्या करायला गेले, म्हणजे कचऱ्यातून, गुआतून सगळ्यातून पैसै काढायचा उद्योग चालू असल्याचा आरोप आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केला आहे.

सातारा- शाहुपुरी येथील कण्हेर पाणीपुरवठा योजनेवरून दोन्ही राजेमध्ये श्रेयवाद पेटला. शाहूपुरी येथील पाण्याच्या टाक्याचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यानंतर आ. श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनी आज पाण्याच्या टाकीचे उद्घाटन दुसऱ्यांदा केले. एकाच योजनेचे व विकासकामाचे उदघाटन दुसऱ्यांदा करण्यात आल्याने हा चर्चेचा विषय बनला आहे. यावेळी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले बोलत होते. कार्यक्रमास अभियंता एस. आर. अग्रवाल, पल्लवी मोटे- चाैगुले, राजू भोसले यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, हद्दवाढ आणि शाहुपुरीचा पाणीप्रश्न सोडवण्यात यश आल्यामुळे नक्कीच मला आमदार म्हणून आनंद आहे. आमदार फंडातील डांबरीकरण झाले तरी मीच केले. या पाणी योजनेची तसेच आहे. खासदारांनी या योजनेच्या पाठपुराव्यासाठी केलेला पाठपुरवा, बैठक घेतली त्यांचा इतिवृत्तात फोटो दाखवावा. कासच्या कामातही असाच प्रकार आहे. केवळ स्वतःचे पदाधिकारी घ्यायचे आणि दादागिरी करायची.  पाच वर्षे केवळ नागरिकांची लूट केलेली आहे.

Leave a Comment