MIM च्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर निलेश राणेंचे राज्य सरकारला खुलं आव्हान; म्हणाले की…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुस्लीम समाजाला आरक्षण मिळावे यासाठी एमआयएम ने मुंबईत मोर्चा काढला. औरंगाबाद पासून सुरू झालेला हा मोर्चा काल रात्री अखेर मुंबईत धडकला.मुंबईत ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर जमावबंदी लागू करण्यात आली असताना देखील एमआयएमचा मोर्चा मुंबईत दाखल झाला आणि सभा पार पडली, यावरून भाजप नेते निलेश राणे यांनी राज्यातील ठाकरे सरकार वर टीका केली आहे.

आज MIM पक्षाने मुस्लिम आरक्षणासाठी संभाजीनगर ते मुंबई मोर्चा काढलाय. आरामात गाडीत बसून येणार आंदोलनकारी. MIM ला हा मोर्चा फक्त महाराष्ट्रातच काढावासा का वाटला? विशेष म्हणजे मुंबईत सेक्शन 144 लागू झाले आहे, बघुया ठाकरे सरकार त्यांना अडवतं का आणि किती लोकांवर केसेस टाकतं अस ट्विट करत निलेश राणे यांनी सरकारला आव्हान दिले.

दरम्यान, काल मुंबईतील चांदीवली भागात एमआयएम ची सभा पार पडली. आरक्षणाच्या मुद्द्यावरून खासदार असदुद्दीन ओवेसी आणि इम्तियाज जलील यांनी राज्य सरकार वर टीका केली तसेच त्यांनी मुस्लीम समाजाला पक्ष, नेता, सर्व झेंडे बाजूला ठेवून आरक्षणासाठी एकत्र यावे, असे आवाहन देखील केले.

Leave a Comment