व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

स्पॉट नानाची बॉडी लँग्वेज बघितली तर कळतंय याची अर्धी जिरली; राणेंचा अनिल परबांना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब याना इडीचे दुसरे समन्स आल्यानंतर आज ते चौकशी साठी ईडी कार्यालयात दाखल झाले आहेत. मी काहीही चूक केली नाही अस अनिल परब यांनी यावेळी म्हंटल होत. यानंतर भाजप नेते निलेश राणे यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.

चूक झाली नाही म्हणून चौकशीला सामोरं जातोय पेक्षा चौकशीला सामोरं गेलो नाही तर भलताच घोडा लागेल म्हणून. आता कुठे चौकशी सुरू झाली आहे आणि आत्ताच स्पॉट नानाची बॉडी लँग्वेज बघितली तर कळतंय याची अर्धी जिरली.

अनिल परब नेमकं काय म्हणाले

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि माझ्या मुलीचं शपथ घेऊन मी मागेच सांगितलं होतं की मी काही चुकीचं केलेलं नाही. आताही तेच सांगत आहे. मी काहीच चुकीचं काम केलं नाही. मी ईडी कार्यालयात जात असून नेमकं कशासाठी बोलवलं आहे हे अजूनही त्यांनी सांगितले नाही अस अनिल परब यांनी म्हंटल.