बाळासाहेब असते तर राऊतांच्या ढुंगणावर लाथ मारून हाकलून दिले असत; राणेंची जीभ घसरली

0
60
rane raut
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपाला देशाचे ऐक्य नको आहे हे शरद पवार यांनी २५ वर्षापूर्वी सांगितले आणि आम्हाला दोन वर्षापूर्वी थोडे लक्षात आले असे म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीका केल्यानंतर भाजप नेते निलेश राणे यांनी संजय राऊतांवर घणाघाती टीका केली आहे. बाळासाहेब असते तर राऊतांच्या ढुंगणावर लाथ मारून हाकलून दिला असत अशा शब्दांत त्यांनी निशाणा साधला.

पवार साहेब 25 वर्ष जे बोलले ते संजयला दोन वर्षापुर्वी कळू लागले, कळायला इतकी वर्ष लागली तर मग खरा चू.. संज्या निघाला… स्वा. बाळासाहेब असते तर संज्याला ढुंगणावर लाथ मारून हाकलून दिला असता कारण 25 वर्ष बाळासाहेबांच्या विचारांना काही अर्थ नव्हता असं म्हणायचं आहे संज्याला अशा शब्दांत निलेश राणे यांनी राऊतांवर घणाघाती टीका केली.

संजय राऊत नेमकं काय म्हणले-

आपल्या देशामध्ये जे विकृत राजकाराण सुरु आहे त्यावरसुद्धा शरद पवारांनी २५ वर्षापूर्वी त्यांच्या भाषणातून कोरडे ओढले आहेत. भाजपाला देशाचे ऐक्य नको आहे हे त्यांनी २५ वर्षापूर्वी सांगितले आणि आम्हाला दोन वर्षापूर्वी थोडे लक्षात आले. ते तेव्हापासून सांगत आहेत की भाजपा देशाचे तुकडे करत आहे. भाजपा देशाला उलट्या दिशेने नेत आहे हे शरद पवारांनी १९९६ साली सांगितले आणि आम्हाला आता ते कळायला लागले आहे,” असे संजय राऊत यांनी म्हटले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here