हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काल दसरा मेळाव्या निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी रोखटोख भाषण करताना राणे कुटुंबियांची खिल्ली उडवली होती. मुख्यमंत्र्यांच्या टीकेला निलेश राणेंनी खरमरती प्रत्युत्तर दिले आहे. अभिनेत्री दिशा सालियन प्रकरणात कोण अडकलंय हे सर्वांना माहीत आहे. वेगळं सांगण्याची गरज नाही. या प्रकरणाचा निष्पक्षपाती तपास झाला तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागेल, असा गंभीर आरोप निलेश राणे यांनी केला आहे. तसेच आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे,अशी मागणीही त्यांनी केली.
दिशा सालियन प्रकरणात कोण अडकलंय हे वेगळं सांगण्याची गरज नाही. बलात्कार कुणी केला आणि हत्या कुणी केली हे सांगण्याची गरज नाही. हा तपास बाहेर आला तर उद्धव ठाकरेंना राजीनामा द्यावा लागेल. मात्र, सत्य बाहेर येऊ नये यासाठी पोलिसांचा गैरवापर केला जात आहे. आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे, असं निलेश राणे म्हणाले.
सुशांतसिंह राजपूतची बॉडी एम्सकडे नव्हती. त्यामुळे एम्सलाही मर्यादा पडल्या. या प्रकरणात जे डमी पुरावे दिले गेले त्यानुसारच तपास झाला, असं सांगतानाच पोलीस दलातील काही अधिकारी दबावाखाली काम करत असतील. पुराव्याची अफरातफर करत असतील. म्हणूनच तपास चुकीचा झाला. असे निलेश राणे यांनी म्हंटल.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’