हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेच्या दसरा मेळाव्या निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जोरदार भाषण करत भाजपसाहित नारायण राणे आणि कुटुंबियांनवर जोरदार प्रहार केला. गेल्या काही दिवसांपासून एक बेडूक आणि त्याची दोन पिल्लं शिवसेनेविरोधात ओरडत फिरत आहेत, अशी घणाघाती टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी नाव न घेता राणे पितापुत्रांवर केली. उद्धव ठाकरेंनी केलेली टीका राणे पुत्रांच्या चांगलीच जिव्हारी लागली असून नारायण राणेंचे दोन्ही पुत्र चांगलेच खवळले आहेत. माजी खासदार निलेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केला आहे.
नेहमीप्रमाणे दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी फालतू आणि पोकळ भाषण केलं. मराठा व धनगर आरक्षणाबद्दल 1 वाक्य, पण बिहारवर 20 मिनिटे. उद्धव ठाकरे धमकी कोणाला देता, आम्ही चॅलेंज देतो एका दिवसासाठी विसरा तुम्ही मुख्यमंत्री आहात आणि होऊन जाऊ दे एकदा… तुमच्या धमक्यांना आम्ही फाट्यावर मारतो, असं ट्विट करत निलेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे.
नेहमीप्रमाणे दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी फालतू आणि पोकळ भाषण केलं. मराठा व धनगर आरक्षणाबद्दल १ वाक्य पण बिहारवर २० मिनिट. उद्धव ठाकरे धमकी कोणाला देता, आम्ही चॅलेंज देतो एका दिवसासाठी विसरा तुम्ही मुख्यमंत्री आहात आणि होऊन जाऊ दे एकदा… तुमच्या धमक्यांना आम्ही फाट्यावर मारतो.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) October 25, 2020
तत्पूर्वी नितेश राणेंनीही ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर पलटवार केला होता. दुसऱ्यांची पिल्लं वाईट…मग त्यांनी काय DINO च्या खुशित नशा करुन मुलींवर अत्याचार करणारा “श्रावणबाळ” जन्माला घातला आहे का? अशी टीका भाजप आमदार नितेश राणे यांनी केली होती. इतकी खुम खुमी आहे ना मग ती Disha Salain ची केस मुंबई पोलिसांवर कुठलाही दबाव न टाकता निपक्षपाती चौकशी करुन द्या.. मग कळेल श्रावणबाळ काय दिवे लावतो ते!,” अशी टीका नितेश राणे यांनी अधिकृत ट्विटरवरुन केली.
दुसऱ्यांची 'पिल्ल' वाईट..
मग यांनी काय त्या DINO च्या खुशित नशा करुन मुलींवर अत्याचार करणारा "श्रवणबाळ" जन्माला घातला आहे का?
इतकी खुम खुमी आहे ना मग ती Disha Salain ची केस मुंबई पुलिस वर कुठला ही दबाव न टाकता निपक्षपाती चौकशी करुन दया..
मग कळेल श्रावणबाळ काय दिवे लावतो ते!— nitesh rane (@NiteshNRane) October 25, 2020
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’