हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल फेसबुक लाइव्ह द्वारे जनतेशी संवाद साधला. त्यातून त्यांनी अनेक महत्त्वाच्या गोष्टीवर भाष्य करताना आरेतील मेट्रो कारशेड ही कांजुरमार्ग येथे हलविणार असल्याची माहिती दिली. राज्य सरकारनं मेट्रो कारशेडबद्दल घेतलेल्या निर्णयावरून विरोधकांकडून टीका होताना दिसत आहे. माजी खासदार आणि भाजपा नेते निलेश राणे यांनी मेट्रो कारशेडच्या निर्णयावरून उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर निलेश राणे यांनी ट्विट करत या निर्णयावरून ठाकरे यांना लक्ष्य केलं आहे. “आरे मेट्रो कारशेडची जागा बदलण्याचे एकमेव कारण म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या दोन्ही मुलांचा हट्ट. करोडो रुपये वाया जाणार, नवीन परवानग्या कधी मिळतील व मिळतील की नाही माहीत नाही, कारण ती जमीन भुसभुशीत (खारफुटी सारखी) आहे. किमान ५ हजार कोटी या नवीन उभारणीसाठी लागणार… आधीचे पैसे गेले,” असं म्हणत निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
आरे मेट्रो कारशेडची जागा बदलण्याचे एकमेव कारण म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या दोन्ही मुलांचा हट्ट. करोडो रुपये वाया जाणार, नवीन परवानग्या कधी मिळतील व मिळतील की नाही माहीत नाही कारण ती जमीन भुसभुशीत (खारफुटी सारखी) आहे. किमान ५ हजार कोटी या नवीन उभारणीसाठी लागणार… आधीचे पैसे गेले.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) October 11, 2020
दरम्यान, पर्यावरणाचा ऱ्हास करून होणारी प्रगती मान्य नसल्याचे स्पष्ट करत आरे येथील मेट्रो कारशेड कांजूरमार्ग येथील सरकारी जमिनीवर उभारण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. तसे आदेशही मुंबई मेट्रो रेल कार्पोरेशनला दिल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी केली.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’