हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन |राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सोमवारी विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. विरोधी पक्षनेतेपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर अजित पवारांनी आभार प्रदर्शनाच्या भाषणा दरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणेंचाही उल्लेख केला. या मुद्द्यावरुन राणे यांचे पुत्र व भाजपाचे नेते निलेश राणे यांनी ट्विट करत आभार मानले आहेत.
निलेश राणेंनी राणेंनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, “आम्हाला दुसरं काही नको. आमच्या माणसाला मानसन्मान दिलात, बदल्यात तुमच्या पाया पण पडू,” अशा कॅप्शनहीत हात जोडणारा इमोन्जी वापरुन निलेश राणेंनी अजित पवारांनी केलेल्या राणेंच्या या उल्लेखावर प्रतिक्रिया दिली आहे.
आम्हाला दुसरं काही नको आमच्या माणसाला मानसन्मान दिलात, बदल्यात तुमच्या पाया पण पडू 🙏🏻 pic.twitter.com/S4igWsDbd6
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) July 4, 2022
आपल्या भाषण वेळी अजित पवार म्हणाले की,
“नारायण राणेंच्या वेळेस दरारा असायचा. त्यांनी नुसतं मागे वळून बघितलं की चिडीचूप व्हायचे शिवसेनेचे. सगळे खाली बसायचे. असला दरारा मी शिवसेनेमध्ये दुसऱ्या कुणाचा बघितला नाही. पण राणेंनी हा दबदबा स्वत: निर्माण केलेला होता,” असं अजित पवार आपल्या भाषणादरम्यान म्हणाले. अजित पवारांच्या भाषणातील हीच क्लिप शेअर करत निलेश राणेंनी अजित पवारांचे आभार मानले आहेत.
यापूर्वी अनेकदा निलेश राणेंनी अजित पवारांवर टीका केल्याचं पहायला मिळालं आहे. मात्र कालच्या भाषणात अजित पवारांनी त्यांच्या वडिलांचा उल्लेख केल्याने निलेश राणेंनी अजित पवारांचे अप्रत्यक्षपणे आभार मानले आहेत