हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राणे कुटुंबाकडून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केल्यानंतर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी नाराजी व्यक्त करत राणेंवर निशाणा साधला होता. नारायण राणे यांची मुले लहान आहेत, त्यांना समजवण्याच काम देवेंद्र फडणवीस करतील अस म्हणत दीपक केसरकर यांनी राणेंना डिवचले होते. त्यावर निलेश राणे यांनी ट्विट करत जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. केसरकर, लायकी पेक्षा जास्त बोलू नका अस म्हणत निलेश राणे यांनी त्यांना फटकारले आहे.
निलेश राणे म्हणाले, दीपक केसरकर 25 दिवसांपूर्वी तुम्ही किती लहान होतात हे विसरू नका. इज्जत मिळते तर ती घ्यायला शिका, लायकी पेक्षा जास्त बोलू नका. तुम्ही शिंदे गटाचे प्रवक्ते असू शकता पण आमचे नाही. तुमची मतदारसंघात आम्ही काय अवस्था केली आहे ते आम्हाला माहित आहे अस निलेश राणे म्हणाले.
दीपक केसरकर लिमिटमध्ये राहा. pic.twitter.com/LARj8cVLoO
— Nilesh N Rane (Modi ka Parivaar) (@meNeeleshNRane) July 13, 2022
याच भाजपच्या २ मुलांनी तुमची नगरपालिका तुमच्याकडून घेतली. तुमची लायकी आम्हाला चांगली माहित आहे. त्यामुळे इज्जत मिळत आहे ती घ्यायला शिका नाहीतर आम्ही काय गप्प बसणार नाही. कोणाला काय बोलायच कुठं बोलायचं हे आधी विचारून घ्या आणि मगच तोंड उघडा असा इशारा निलेश राणे यांनी दीपक केसरकर यांना दिला.