हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या घरी ईडीची टीम दाखल झाली आहे. पत्राचाळ प्रकरणी ईडी त्यांची चौकशी करण्याची शक्यता असून राऊतांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते निलेश राणे यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. संजय राऊत यांची पुढची मुलाखत जेलमध्ये जेलर सोबत असेल अशी टीका त्यांनी केली आहे.
निलेश राणे यांनी ट्विट करत म्हंटल की, ईडीच्या चौकशीला सहकार्यच करायचं नाही असं संजय राऊतांनी ठरवलं होत त्यामुळे ईडी ला त्यांच्या घरी जावं लागलं . १२०० कोटींचा एवढा मोठा घोटाळा झाल्यामुळे संजय राऊतांना ईडीच्या प्रश्नांना उत्तरे द्यावीच लागणार आहेत. ब्रिटिशांनी काय देश सोडताना याच्या नावाने प्रमाणपत्र दिले आहे का कि याच्यावर कारवाई होता काम नये . याने असले चाळे केले तरी चालतील, महिलांना शिव्या घातल्या तरी चालेल तरी याला काय करू नका असं प्रमाणपत्र राऊतांकडे आहे का ?? असा खोचला सवाल त्यांनी केला
संजय राऊत ची पुढची मुलाखत जेलमध्ये जेलर सोबत. pic.twitter.com/HO2XnwcXEB
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) July 31, 2022
संजय राऊतांनी नाटक करणं बंद करावं, चौकशीला सहकार्य करा. तरच मार्ग निघू शकतो पण उगीच जर तुम्ही धुमाकूळ घालण्याचा प्रयत्न केला तर तुमची पुढची मुलाखत जेमध्ये जेलर सोबत होईल असा इशारा निलेश राणे यांनी संजय राऊत याना दिला.
दरम्यान, पत्राचाळ प्रकरणी चौकशी करण्यासाठी ईडीचे सुमारे १० अधिकारी संजय राऊतांच्या घरी गेलेलं आहेत. या आधीही पत्राचाळ प्रकरणामध्ये संजय राऊतांना ईडीने चौकशीसाठी बोलावलं होतं. मागील आठवड्यात २ वेळा ईडीने त्यांना समन्स बजावले होते. मात्र संसदेचं अधिवेशन सुरु असल्याचे कारण देत संजय राऊतांनी चौकशीसाठी मुदतवाढ मागवून घेतली होती. मात्र आज अचानक ईडीचं पथक थेट राऊत यांच्या घरी पोहोचल्याने राऊत यांच्या अडचणीत वाढ झाल्याचं सांगितलं जात आहे. राऊतांच्या अटकेची देखील शक्यता आहे.