उद्धवचा बाजार उठला, कर्मा रिटर्न्स; राणेंची जहरी टीका

0
149
Nilesh Rane Uddhav Thackarey
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अंधेरी पोटनिवडणुकीपूर्वीच शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगाने गोठवलं आहे. याशिवाय उद्धव थाकत्र आणि शिंदे गटाला आता शिवसेना हे नावही वापरता येणार नाही. उद्धव ठाकरेंची हा मोठा धक्का मानला जात आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते निलेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे. उद्धवचा बाजार उठला, कर्मा रिटर्न्स अशी घणाघाती टीका त्यांनी केली.

नियतीने उद्धव ठाकरेचे बारा वाजवले, फुकट मिळालेल्या गोष्टींवर किती उडायचं याला पण मर्यादा आहेत. उद्धव ठाकरे ने आयुष्य फुकट बसून खाल्लं, त्याला वाटलं सगळं असंच राहणार पण हे कर्म आहेत उद्धव ठाकरे तुला याच जन्मात फेडावे लागणार आणि ही सुरुवात आहे अजून भरपूर तुला भोगावे लागणार असा इशारा निलेश राणे यांनी दिला.

बाळासाहेबांनी स्वर्गातून देखील आपला शब्द पूर्ण केला, ज्या दिवशी माझी शिवसेना काँग्रेस होत असेल त्या दिवशी मी माझं दुकान बंद करेन आणि आज शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधलेली पाहून बाळासाहेबांनी स्थापन केलेला शिवसेना पक्षाचं अधिकृत चिन्ह गेलं. उद्धव चा बाजार उठला, कर्मा रिटर्न्स असं म्हणत राणेंनी उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली आहे.

उगाच आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांची तुलना उद्धव ठाकरे बरोबर करू नका. त्यांचे वडील काँग्रेसमध्ये होते तिथून ते वेगळे झाले आणि स्वतःचा पक्ष उभा करून ते मुख्यमंत्री झाले. उद्धव ठाकरेला बापाचा पक्ष आयता मिळाला आणि तोच पक्ष संपवणारा उद्धव ठाकरे एकच असेही ते म्हणाले.