हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुणे जिल्ह्याची पाल्कमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर भाजपकडून वारंवार टीका केली जात आहे. कधी कोरोना परिस्थिती तर कधी निर्बंधांवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यानाच्यावर विरोधक निशाणा साधत आहेत. दरम्यान आज भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सचिव निलेश राणे यांनी ट्विट करीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्याची वाट लावली असल्याची टीका कृती हल्लाबोल केला आहे.
भाजपनेते निलेश राणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करताना आपल्या ट्विटमध्ये म्हंटल आहे की, “ज्या पद्धतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्याची वाट लावली आहे, पुण्याची अर्थव्यवस्था पूर्वपदावर येण्यासाठी किती वर्षे लागतील हे कुठला अर्थतज्ञ सुद्धा सांगू शकणार नाही. अजित पवारांनी पुण्याला कोंडून ठेवलं आणि अर्थमंत्री असून सुद्धा त्यांना अर्थव्यवस्था हाताळता आली नाही,” असे राणे यांनी म्हंटल आहे.
ज्या पद्धतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्याची वाट लावली आहे, पुण्याची अर्थव्यवस्था पूर्वपदावर येण्यासाठी किती वर्षे लागतील हे कुठला अर्थतज्ञ सुद्धा सांगू शकणार नाही. अजित पवारांनी पुण्याला कोंडून ठेवलं आणि अर्थमंत्री असून सुद्धा त्यांना अर्थव्यवस्था हाताळता आली नाही.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) August 3, 2021
पुणे जिल्हयात कोरोना रुग्ण संख्येत मागील महिन्यात वाढ झाली होती. त्यावेळी या ठिकाणी भाजपकडून आढावा घेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आरोपही करण्यात आले होते. तसेच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या अजित पवार यांनी पुण्यातील प्रश्नांमध्ये जातीने लक्ष घालायला सुरुवात केल्यामुळे त्यांच्यावर आता भाजपकडून पुन्हा निशाणा साधला जात आहे. दरम्यान आज भाजप नेते निलेश राणे यांनी पुण्यातील अर्थव्यवस्थेवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली आहे.