हॅलो महाराष्ट्र आॅनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार आणि भाजप नेते निलेश राणे यांच्यातील ट्विटर वाॅर चांगलेच रंगले आहे. दोघेही एकमेकांवर टिकास्त्र सोडत आहेत. निलेश राणे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर साखर कारखान्यांवरुन टिका केली होती. त्यानंतर रोहित पवारांनी आजोबांच्या मदतीला उतरत राणे यांना कुकुटपालनावरुन टोला मारला होता. यानंतर बर्याच शाब्दिक चकमकींनंतर आता राणे यांनी हा तर ट्रेलर आहे. माझ्याबरोबर असली भाषा करायची नाही असे म्हणत रोहित पवार यांना सुनावले आहे.
साखर विषयावर किती पैसे महाराष्ट्रात खर्च झाले ह्यावर audit झालंच पाहिजे. साखर कारखाने करोडोंची उलाढाल करतात, राज्य सरकार, राज्य बँक, जिल्हा बँका सगळे साखर व्यवसायाला वर्षों वर्ष साथ देत आलेत. तरी वाचवा??
साखर उद्योगाला वाचवा; शरद पवारांचं मोदींना पत्र https://t.co/jQ02FOLjvb
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) May 15, 2020
सर्वात प्रथम निलेश राणे यांनी शरद पवारांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहून साखर कारखान्यांबाबत चिंता व्यक्त करण्यावरुन टीका केली होती. “साखर विषयावर किती पैसे महाराष्ट्रात खर्च झाले ह्यावर आॅडिट झालंच पाहिजे. साखर कारखाने करोडोंची उलाढाल करतात, राज्य सरकार, राज्य बँक, जिल्हा बँका सगळे साखर व्यवसायाला वर्षों वर्ष साथ देत आलेत” असं राणे यांनी म्हटले होते.
मी आपणास सांगू इच्छितो की @PawarSpeaks साहेबांनी साखर उद्योगासह 'कुक्कुटपालन' व इतर उद्योगातील दुरवस्थेबाबतही केंद्राला पत्र पाठवून उपाययोजना सुचवल्या आहेत.साहेब प्रत्येक गोष्ट अभ्यासपूर्वक मांडत असल्यानेच पंतप्रधान मोदीजीही त्यावर सकारात्मक विचार करतात.
त्यामुळे काळजी नसावी. https://t.co/Fqe9QWKBlQ— Rohit Pawar (@RRPSpeaks) May 16, 2020
रोहित पवार यांनी राणे यांच्या शरद पवारांवरील ट्विटला प्रत्युत्तर देत शरद पवारांनी साखर उद्योगासह ‘कुक्कुटपालन’ व इतर उद्योगातील दुरवस्थेबाबतही केंद्राला पत्र पाठवून उपाययोजना सुचवल्या आहेत. साहेब प्रत्येक गोष्ट अभ्यासपूर्वक मांडत असल्यानेच पंतप्रधान मोदीजीही त्यावर सकारात्मक विचार करतात. त्यामुळे काळजी नसावी. असे म्हणले होते. यातील कुकुटपालनाचा टोला राणे यांना विशेष लागला होता. त्यानंतर राणे यांनी “मी साखरेवर बोललो पवार साहेबांवर नाही… कुकुटपालनाची मागणी केली असेल तर तुझ्यासाठी चांगली आहे, तुला गरज आहे. साखरेवर बोल्यावर मिरची का लागली??? मतदार संघावर लक्ष दे सगळी कडे नाक टाकू नकोस नाही तर साखरकारखान्या सारखी हालत होईल तुझी” असे म्हटले होते.
मी साखरेवर बोललो पवार साहेबांवर नाही… कुकुटपालनाची मागणी केली असेल तर तुझ्यासाठी चांगली आहे, तुला गरज आहे. साखरेवर बोल्यावर मिरची का लागली??? मतदार संघावर लक्ष दे सगळी कडे नाक टाकू नकोस नाही तर साखरकारखान्या सारखी हालत होईल तुझी. https://t.co/nEJDfyblX7
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) May 16, 2020
यानंतर राष्ट्रवादीचेने नेते आणि राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे हे रोहित पवारांच्या बाजुने मैदानात उतरले होते. राष्ट्रवादीवाले टप्प्यात आल्यावर कार्यक्रम करतात असं विधान केलं होतं. त्यानंतर राणे यांनी शेलक्या भाषेत तनपुरे यांना प्रत्युत्तर दिले होते. यावर रोहित पवार यांनी “आपले विचार, आपली भाषा व आपलं काम यातून आपण कोण आहोत हे लक्षात येतं. काही गोष्टींकडे दुर्लक्ष करून त्या सोडून द्यायच्या असतात, पण एकाच गोष्टीला कवटाळून आपल्या विचारांचं प्रदर्शन करण्यात निलेश राणे यांचा नंबर पहिला लागतो” असं म्हणत तनपुरे यांना राणे यांच्याकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन केले होते.
कोणतरी हिजडा राज्यमंत्री आहे तनपुरे नावाचा ज्याला माझा कार्यक्रम करायचा आहे. असे कार्यक्रम करणारे आम्ही खूप बघितले… समोर आले की पिवळी होते साल्यांची. जागा सांग तनपूरे, येतो मी.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) May 19, 2020
आता यावर निलेश राणे यांनी पुन्हा रोहित पवार यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. हा “बोलणाऱ्याची लायकी बघून उत्तर देतो मी. धमकी आणि कळ काढायची भाषा माझ्याबरोबर करायची नाही. प्रदर्शन नाही हा ट्रेलर आहे. तुझ काम माहीत आहे मला, बोलत राहिलास तर त्याचं पण ट्रेलर देईन मग लोकंच चप्पलेच्या प्रदर्शनात बसवतील तूला” असं म्हणत राणे यांनी पिक्चर अभी बाकी है असंच काहीसं म्हणत रोहित पचार यांना चेतावणी दिली आहे.
बोलणाऱ्याची लायकी बघून उत्तर देतो मी. धमकी आणि कळ काढायची भाषा माझ्याबरोबर करायची नाही. प्रदर्शन नाही हा ट्रेलर आहे. तुझ काम माहीत आहे मला, बोलत राहिलास तर त्याचं पण ट्रेलर देईन मग लोकंच चप्पलेच्या प्रदर्शनात बसवतील तूला. https://t.co/TzfkkGo6q6
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) May 19, 2020
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”