फलटण | फलटण शहर पोलिसांनी तीन वेगवेगळ्या ठिकाणी छापा मारून जुगार व मटका अड्ड्यांवर केलेल्या कारवाईत सुमारे 32 हजार 890 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून, नऊ जणांना अटक केली आहे .
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, महात्मा फुले मंडई येथे अभिजीत बार शेजारी मोकळ्या जागेत संशयित सुनील मोतीराम पवार ( वय- 38, रा.बुधवार पेठ फलटण) हा लोकांचेकडून पैसे स्वीकारून ऑनलाइन गेम /चक्री नावाचा जुगार घेत आहे. त्यावेळी फलटण शहर पोलिसांनी त्यास जागीच पकडून दहा हजार सातशे रुपये रोख रकमेसह जुगार साहित्य मिळून आले. याबाबत पोलीस शिपाई सुजित सुरेश मेंगावडे यांनी फिर्याद दिली आहे. पुढील तपास पोलीस नाईक सर्जेराव सूळ करीत आहेत.
तर दुसऱ्या कारवाईत रविवार पेठ बसस्थानकासमोरील भवानी मार्केट भिंतीलगत सुरज दिलीप काकडे (वय 32, रा. मंगळवार पेठ फलटण) हा मटका घेत असताना मिळून आला. त्याच्याकडून 840 रुपये रोख रकमेसह, एक स्लिप बुक त्यावर मटक्याचे आकडे लिहिलेले व एक पेन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अच्युत साहेबराव जगताप यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुरज दिलीप काकडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक लोंढे हे करीत आहेत.
तिसऱ्या कारवाईत तेली गल्ली शुक्रवार पेठ फलटण येथे संशयित हनुमंत गंगतीरे (रा. मारुती मंदिर फलटण) याचे घरात पत्त्याच्या पानावर जुगार खेळत होते. तेथे सचिन सुभाष चव्हाण (वय -37, रा .लक्ष्मी नगर फलटण), बाळू हनुमंत काळे (वय- 54, रा. दत्तनगर फलटण), मुस्ताक मेहबूब शेख (वय- 58,रा. कसबा पेठ फलटण), मुनीर अहमद महात (वय- 48, रा .फलटण), अखिल बक्षू शेख (वय- 48. रा. लक्ष्मीनगर फलटण), गिरधारी मोहन लाल लोहाना (वय- 54, रा .मारवाड पेठ फलटण) या सात संशियताकडून 21 हजार 350 रुपये रोख रक्कम व जुगार साहित्यासह ताब्यात घेतले. पोलीस शिपाई अच्युत साहेबराव जगताप यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अटक केली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार काकडे हे करीत आहेत .
सदरची कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बर्डे, फलटण शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भारत किंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रावळ, पोलीस हवालदार ठाकूर ,पोलीस नाईक सर्जेराव सुळ, पोलीस नाईक विक्रांत लावंड, पोलीस शिपाई सुजित मेंगावडे यांनी केली आहे.
सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा
Click Here to Join Our WhatsApp Group