खुशखबर ! आता प्रवासी रेल्वे सेवा पुन्हा सुरू होणार, यासाठी रेल्वेची योजना काय आहे ते जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । रेल्वे प्रवाश्यांसाठी (Rail passengers) मोठा दिलासा देणारी बातमी आहे. भारतीय रेल्वे कोरोना विषाणूमुळे (Corona virus) बंद झालेल्या अनेक गाड्या (Train) चालवण्याची तयारी करत आहे. भारतीय रेल्वे (Indian Railway) लवकरच प्रवासी सेवा पूर्णपणे सुरू करू शकेल. रेल्वे पुढील दोन महिन्यांत कोविडपूर्व स्थितीवर येऊ शकते. येत्या दोन महिन्यांत प्रवासी सेवा पूर्णपणे पूर्ववत होऊ शकेल, असे सूत्रांनी पीटीआयला सांगितले आहे. यादरम्यान सुरू होणाऱ्या गाड्या या रेग्युलर नसून केवळ स्पेशल रेल्वेगाड्याच सुरू होण्याची शक्यता आहे. तथापि, हे देखील सांगितले जात आहे की,” जेव्हा राज्य सरकारांकडून यासाठी मान्यता मिळेल तेव्हाच हे शक्य सुरु होणे शक्यआहे तसेच त्या वेळी कोरोनोव्हायरस साथीच्या आजारावर देखील नियंत्रण मिळवले पाहिजे”.

प्रवाश्यांना दिलासा मिळेल
प्रवासी रेल्वे सेवा पुन्हा सुरू करावी, अशी मागणी रेल्वे प्रवाशांकडून बऱ्याच वेळा करण्यात आली आहे. कमी भाडे आणि दैनंदिन कामांमुळे या प्रवासी गाड्या ये-जा करण्यासाठी फायदेशीर आहेत. परंतु अशा गाड्यांमध्ये प्रवाशांच्या गर्दीमुळे संसर्ग होण्याची जास्त भीती होती. अशा परिस्थितीत रेल्वेने ही सेवा सुरु केली नाही. परंतु आता परिस्थितीत सुधारणा झाल्याने ते पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सध्या फक्त 66% गाड्याच धावत आहेत
सद्यस्थितीत केवळ 66 टक्के गाड्याच स्पेशल गाड्या म्हणून सेवेत आहेत. रेल्वेने सुरु केलेल्या स्पेशल गाड्यांचे भाडे किरकोळ असते. काही श्रेणी वगळता कोणत्याही सवलती नाहीत आणि त्या पूर्णपणे राखीव सेवा आहेत. आतापर्यंत, 77 टक्के मेल, एक्स्प्रेस गाड्या सेवेत आहेत. तर उपनगरीय गाड्यांपैकी फक्त 91 टक्के गाड्याच धावत आहेत. त्याचबरोबर सध्या केवळ 20 टक्के प्रवासी गाड्या रुळावर आहेत.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment