कोरोनासोबत आता निपाह : राज्यात महाबळेश्वरमध्ये वटवाघळांत विषाणू आढळल्याची NIV तज्ञांची माहिती

Vatvagul
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे | कोरोनाची दुसरी लाट सुरू असताना आता तिसऱ्या लाट येण्याची शक्यता आहे. अशावेळी आता राज्यातील वटवाघळांच्या दोन प्रजातींमध्ये निपाह विषाणू आढळून आला आहे. याबाबतचे पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरोलॉजीच्या तज्ज्ञांनी संशोधन केलं आहे. निपाह विषाणू सातारा जिल्ह्यातील मिनीकाश्मीर म्हणून अोळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरमधील गुफेत मार्च २०२० मध्ये आढळून आला आहे. याआधी राज्यात कधीही वटवाघळांमध्ये निपाह विषाणू आढळून आला नव्हता अशी माहिती याबद्दलचं संशोधन करणाऱ्या पथकाच्या प्रमुख डॉ. प्रज्ञा यादव यांनी दिली.

देशात याआधी काही राज्यांमध्ये निपाह विषाणू आढळून आला आहे. मात्र महाराष्ट्रात पहिल्यादांच आढळला असून हा विषाणू वटवाघूळांमधून माणसांमध्ये संक्रमित होतो. निपाह विषाणू अतिशय धोकादायक मानला जातो. निपाहवर कोणतंही औषध किंवा लस उपलब्ध नाही.

निपाह हा विषाणू 1998-99 मध्ये सर्वप्रथम आढळून आला होता. भारतात 2018 मध्ये केरळ राज्यात वटवाघळाच्या माध्यमातून पसरला होता. यावेळी या निपाहने केरळ राज्यात थैमान घातले असल्याने राज्याची सिमा बंद ठेवण्यात आल्या होत्या. आता महाराष्ट्रात निपाह आढळून आल्याने कोरोना सोबत यांचाही सामना कराव लागणार की काय असे चित्र निर्माण झाले आहे.