ठाकरे अन् त्यांच्या पत्नीचं पटत नाही असं राऊतांनी…; राणेंचा खळबळजनक आरोप

nitesh rane
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकीकडे राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असताना दुसरीकडे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विधिमंडळाला चोरमंडळ म्हणल्याने राज्यातील सत्ताधारी भाजप आणि शिंदे गट आक्रमक झाला आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप आमदार नितेश राणे यांनी सभागृहात बोलताना संजय राऊत यांना सरळसरळ धमकी दिली आहे. 10 मिनिटांसाठी संजय राऊतांचे संरक्षण काढा, उद्या ते दिसणार पण नाहीत असा थेट इशारा राणेंनी दिला. तसेच बाळासाहेब ठाकरे अन् त्यांच्या पत्नीचं पटत नाही असं राऊतांनी लिहिलं होत असा खुलासाही त्यांनी केला.

नितेश राणे म्हणाले, आपल्याला रोज सकाळी संजय राऊतांचं ऐकावं लागतं. महाराष्ट्राला याची गरज आहे का? आपण त्यांचं काय घेऊन खाल्लं आहे. राऊतांचा आणि शिवसेनेचा काय संबंध आहे? ते सामनात येण्याआधी त्यांचे सगळे लेख शिवसेनेच्या विरोधात होते. तेव्हा त्यांची एवढी हिंमत झालेली की, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विरोधात लिहिलं, शिवसेनेच्या विरोधात लिहिलं होतं असं राणे म्हणाले.

बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या पत्नीचे पटत नाही असं संजय राऊत यांनी लिहिलं होत. पोलिसांचे संरक्षण घेऊन संजय राऊत फिरतो. त्यांनी मार्मिकमध्ये छापलेलं कार्टून बघा. देशाचे गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल असं छापू शकतात का? त्यांना शिव्या देऊ शकतात का? संजय राऊतांचं 10 मिनिटे संरक्षण काढायला सांगा, ते उद्या सकाळी परत दिसणार नाही, एवढा शब्द देतो,” असं वक्तव्य राणेंनी केलं. त्यामुळे सभागृहातील वातावरण काही काळ तापलं होत