ठाकरे- राणे वादाला शिवसेनेतील ‘हे’ नेते कारणीभूत; नितेश राणेंचा आरोप

Rane Thackarey
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेना यांच्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार घमासान सुरू आहे. राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे शिवसेना आक्रमक झाली होती. त्यानंतर दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वाद झाला होता. दरम्यान राणे- ठाकरे वादाला शिवसेनेतीलच काही नेते कारणीभूत असल्याचा दावा भाजप आमदार नितेश राणे यांनी केला आहे.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत नितेश राणे म्हणाले, उद्धव ठाकरे-राणेंमध्ये हाडवैर नसून ते बनवलं गेल.मुळात राणेसाहेब आणि उद्धव ठाकरे यांच्यात चांगलं नातं होतं. आम्ही तेजस, आदित्य बरोबर खेळलो आहे. परंतु संजय राऊत, सुभाष देसाई आणि अनिल परब यासारखी काही मंडळी आहे. ज्यांना हे नकोय.

उद्धव ठाकरे काही वाईट लोकांचं ऐकत आहेत. नारायण राणे, उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांचे संबंध बिघडवण्याचं काम संजय राऊत यांनीचं केलं आहे. शरद पवार यांच्या सांगण्यावर संजय राऊत हे काम करत आहेत. शिवसेनेतील नेत्यांनीचं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात भांडण लावली आहे, असं वक्तव्य नितेश राणे यांनी केलं आहे.