हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : महाविकास आघाडी सरकारवर विरोधकांकडून दररोज आरोप केले जात आहेत. अशात मराठा आरक्षणाच्या निकालावरून तर महाविकास आघाडी व भाजप यांच्यात चांगलीच जुंपली आहे. महाविकास आघाडी सरकारवर आता भाजपचे आमदार नितेश राणे यांच्याकडूनही आरोप करण्यात आलेले आहेत.
सर्वोच्च न्यायलयाने मराठा आरक्षणा प्रश्नावर महत्त्वाचा निकाल देत मराठा आरक्षणाचा कायदा रद्द केला. हा निर्णय दिल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी व भाजपमध्ये आरोप प्रत्यआरोप केले जाऊ लागले आहेत. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी देखील राज्य सरकारच्या मेघा भरतीच्या घोषणेवरून निशाणा साधला. त्यांनी शुक्रवारी ट्विट करून राज्य सरकरने आता मुडदे पडण्याचा कार्यक्रम हातात घेतल्याची टीकाही केली.
2 दिवसा अगोदर मराठा आरक्षण रद्द..
काल महाराष्ट्र सरकारने 16000 पदांसाठी मेघा भरती जाहीर केली..अजुन किती थुंकणार आमच्यावर??
या पेक्षा सरकारने जाहीर विष वाटप करावे..
या सरकारने तसा पण मुडदे पाडण्याचा कार्यक्रम हातात घेतलाच आहे !!!!— Nitesh Rane (@NiteshNRane) May 7, 2021
नितेश राणे ट्विट करत म्हणाले की, दोन दिवसांअगोदर मराठा आरक्षण रद्द, त्यानंतर गुरुवारी महाराष्ट्र सरकारने १६,००० पदांसाठी मेघा भरती जाहीर केली. अजुन किती थुंकणार आमच्यावर?, असा सवाल उपस्थित करत सरकारने जाहीर विष वाटप करावे, या सरकारने तसा पण मुडदे पाडण्याचा कार्यक्रम हातात घेतलाच आहे, अशी टीका नितेश राणे यांनी केली आहे.