हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आरोग्य विभागाच्या गट-क आणि ड संवर्गातील ६२०५ पदांच्या लेखी परीक्षेतील गोंधळामुळे अखेर ही परीक्षाच रद्द करण्यात आली आहे. यानंतर पुन्हा एकदा राज्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैली झडत आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजप आमदार नितेश राणे यांनी महाविकास आघाडीला लक्ष केलं आहे. या विद्यार्थ्यांची आडनावे ठाकरे, पवार किंवा थोरात असत तर त्यांच्या बाबत अस झालं असत का असा प्रश्न राणेंनी विचारला आहे.
आरोग्य विभागाच्या परीक्षा देण्यासाठी येणारे विद्यार्थी लांबून स्वखर्चाने आले होते जर यांची आडनावे ठाकरे पवार आणि थोरात असती तर त्यांच्याबाबत असं झालं असतं का? ही मंत्र्यांची पोरं असती तर असं झालं असतं का? असा सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे.
. @rajeshtope11 @CMOMaharashtra @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis pic.twitter.com/EzXZKsHV36
— Nitesh Rane (@NiteshNRane) September 25, 2021
आरोग्य विभागाच्या परीक्षा देण्यासाठी येणारे विद्यार्थी लांबून स्वखर्चाने आले होते. तो काही महाविकास आघाडीतील नेत्यांच्या घरी असलेला वसुलीचा पैसा नव्हता,’ असा घणाघात देखील नितेश राणे यांनी केला आहे