आजचा महामोर्चा नेमका कशासाठी? भावी महिला मुख्यमंत्री लॉंच करण्यासाठी का? नितेश राणेंचा हल्लाबोल

0
497
Nitesh Rane Rashmi Thackeray
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडीच्यावतीने आज मुंबईत विराट महामोर्चा काढण्यात आला. या मोर्च्यात आघाडीतील सर्व नेते सहभागी झाले. यावेळी ठाकरे कुटूंबातील उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे हेही सहभागी झाले. या मोर्च्यानंतर आता भाजप व शिंदे गटातली नेत्यांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ट्विट करत उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

भाजप नेते नितेश राणे यांनी ट्विट करत ठाकरे कुटूंबावर निशाणा साधला. त्यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, “आजच्या महाआघाडीच्या हल्लाबोल्ल मोर्चाचा उद्देश भावी महिला मुख्यमंत्री लॉंच करण्यासाठी होता की महाराष्ट्र हितासाठी होता? …दादा, नाना जागे व्हा, महत्वकांक्षा ओळखा,” असे ट्विटमध्ये राणे यांनी म्हंटले आहे.

महाविकास आघाडीकडून मुंबईत काढण्यात आलेल्या मोर्चात शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाषण केले. महाविकास आघाडीच्या दिग्गज नेत्यांनी यावेळी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला. महाविकास आघाडीच्या या मोर्चावर आता शिंदे गटाकडून खोचक शब्दांमध्ये प्रत्युत्तर देण्यात आले आहे. शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी सडकून टीका केली असून विशेष म्हणजे खोक्यांच्या आरोपांवरुन शीतल म्हात्रे यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा इशारा दिला आहे.

फ्रीजच्या खोक्यातून ‘मातोश्री’वर खोके पोहोचत होते

शीतल म्हात्रे यांनी ठाकरे गटावर टीका करताना म्हंटले आहे की, अगदी फ्रीजच्या खोक्यातून ‘मातोश्री’वर पोहोचत होते त्याबद्दल काय म्हणावं? आतापर्यंत ‘मातोश्री’ कुठल्या खोक्यावर चालत होती यावर आम्हाला बोलायला लावू नका. आम्ही तीन स्टॅंडिंग चेअरमन आहोत. बोलायला लावू नका. खासदार संजय राऊत ज्योतिषी झालेले आहेत. महाविकास आघाडीतले ते पाळीव आहेत. उद्ध्वस्त सेनेला मुंबई महानगरपालिका हातातून निघून जाईल, याची भीती वाटतेय”, अशी खोचक टीका शीतल म्हात्रे यांनी केली आहे.