ज्या लावारीस संजय राऊतला आपला बाप कोण आहे हेच माहित नसेल त्याला काय किंमत द्यायची! – नितेश राणे

0
106
Sanjay Raut
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना नाशिक पोलिसांनी चिपळूण येथून मंगळवारी अटक केली होती. रात्री उशिरा राणे यांना जामीन मंजूर झाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेले वादग्रस्त विधान राणे यांच्या चांगलेच अंगलट आले. राणे यांच्या अटकेनंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले होते. शिवसेनेचे मुखपत्र सामना मधून नारायण राणे यांचा उल्लेख भोकं पडलेला फुगा असा करण्यात आला. सामनामधून राणेंवर करण्यात आलेल्या टिकेला आता नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ज्या लावारिस संजय राऊत ला आपला बाप कोण आहे हेच माहिती नाही त्याला काय किंमत द्यायची असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.

कोण राणे म्हणणारे 2 दिवसांपासून सामनातून अग्रलेख लिहून आपण ठाकरे च्या मिठाला जागतो..आणी पवारांचा लोंबता नाही हे दाखवत आहे! स्व.माँ साहेबबद्दल याच नालायकाने काय लिहिले होते हे लोकप्रभामध्ये वाचावे! ज्या लावारीस संजय राऊतला आपला बाप कोण आहे हेच माहित नसेल त्याला काय किंमत द्यायची! अशा आशयाचे ट्विट नितेश राणे यांनी केले आहे.

दरम्यान, संजय राऊत हे काही संपादक आहेत का? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खुश करण्यासाठी राऊत लिहितात अशी टीका नारायण राणे यांनी काल पत्रकार परिषदेत केली. राणे यांच्या टीकेला प्रत्युत्तर देत सुधर जावो, संभल जाओ असं म्हणत संजय राऊत यांनी राणे यांच्यावर पलटवार केला.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here