हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना कार्यकर्ते संतोष परब हल्ला प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे आज झाले. त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. नितेश राणे न्यायालयात हजर झाल्यानंतर त्याच्या प्रकरणावर सरकारी पक्ष तसेच नितेश राणे यांचे वकील या दोघांच्यात युक्तिवाद करण्यात आला. दरम्यान सरकारी वकिलांनी व पोलिसांनी न्यायालयात या प्रकरणी बाजू मांडत दहा दिवसाची पोलीस कोठडीची मागणी केली.
नितेश राणे आज न्यायालयात हजर झाल्यानंतर त्यांना न्यायालयाच्यावतीने न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. मात्र, सरकारी पक्षाकडून नितेश राणे यांची 5 तर पोलिसांकडून १० दिवसांची पोलीस कोठडी मागितली आहे. त्यामुळे नितेश राणे यांना जामीन मिळणार की नाही याबाबत अद्याप कोणत्याही प्रकारचे स्पष्टीकरण मिळालेले नाही.
कणकवली न्यायालयात शरण जाण्यापूर्वी भाजप आमदार नितेश राणेंनी केंद्रीयमंत्री अमित शहा आणि पी चिदंबरम याचा फोटो ट्विट करीत आघाडी सरकारला इशारा दिला. यावरून शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. केंद्रातील सत्तेचा दुरुपयोग करून महाविकास आघाडी सरकारला तसेच राज्य सरकारला घाबरवण्याच्या कोणी प्रयत्न करू नये, असा इशारा राऊतांनी दिला आहे.